वसई (पालघर) - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. देशातही दिवसेंदिवस कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, म्हणून केंद्र आणि राज्यसरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. संचारबंदीही लागू आहे. घरात रहा, घराबाहेर पडू नका, असे आवाहन शासन वारंवार करत आहे. तरीही असंख्य नागरिक रोजच विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. याबाबत वसईतील एक तीन वर्षाची चिमुरडी सध्या व्हिडिओद्वारे जनजागृती करत आहे.



टाकावू वस्तूंपासून बनविलेला हा करोनाचा पोशाख अनेकांना आकर्षित करित आहे. वसईतील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ बनविल्याचे वीराची आई कविता चौधरींचे म्हणणे आहे. चिमुरडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडिओ करोनाच्या विरोधात जनजागृती करण्याला सहाय्यभूत ठरला आहे.