पालघर - विरारमधील नारंगी गावात राहणाऱ्या तरुणाने आपल्या आईसह विष पिऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू व सरस्वती चौगुले अशी आत्महत्या केलेल्या मायलेकाचे नावे आहेत. कर्जाची परतफेड होत नसल्याने दोघांना आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मायलेकाच्या मृत्यूने मात्र परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू (वय 25) व त्याची आई सरस्वती प्रकाश चौगुले (वय 42) हे दोघे भाडेतत्त्वावर राहत होते. विनय विरारमधील एका स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळायचा तसेच पार्ट टाईम नोकरी देखील करत होता. त्यांच्यावर कर्ज होते. त्या कर्जाची परतफेड करणे त्यांना जमत नव्हते.
त्यामुळे आई आणि मुलगा दोघेही आर्थिक अडचणीला तोंड देत होते. तेव्हा मायलेकाने विष पिऊन आपले आयुष्य संपवविल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, विरार पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.