पालघर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा फटका केवळ मनुष्यांनाच नव्हे तर त्याचे परिणाम पशुपक्षांवरही होत आहेत. यामुळे रस्त्यावर अन्नाशिवाय राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांसाठी सर्वात कठीण वेळ आला आहे. मात्र, या काळात भटकी कुत्री उपाशी पडू नये यासाठी येथील वैशाली चौहान या गेली अनेक दिवस सतत धडपड करीत आहेत.
शहरातील विविध भागात जाऊन तेथील भटक्या कुत्र्यांना वैशाली आपल्या सहकार्यांसह पाणी, दूध, बिस्कीट, ब्रेड, पाव खाऊ घालत आहेत. आपण सर्व कोरोनाच्या संकटाला आपण सामोरे जात आहोत. लॉकडाऊन सर्वकाही बंद आहे. त्यामुळे रस्त्यावर भटकणारे श्वान हे अन्नाच्या शोधात वणवण होत आहे. मात्र, या मुक्या प्राण्यांची उपासमार होऊ नये. यासाठी आपल्याला शक्य होईल, त्याप्रमाणे मुक्या प्राण्यांना खाद्य पुरवत असल्याचे वैशाली चौहान यांनी सांगितले.
हेही वाचा - 'अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी केंद्राचा दुकाने चालू करण्याचा निर्णय योग्य'