ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; दडपशाहीचा आरोप

author img

By

Published : Nov 20, 2020, 12:22 PM IST

Updated : Nov 20, 2020, 12:45 PM IST

विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील नगरपंचायती मधील भ्रष्ट्राचार, भूकंप बाधितांना नुकसान भरपाई द्यावी, कुपोषण, शेतीविषयक मागण्या आदींवर हे आंदोलन होत आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तसेच, याआधी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मनाई आदेश नोटिसा बजावल्या होत्या यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारकडून दडपशाही होत असल्याचा आरोप केला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन

पालघर - विविध मागण्यांसाठी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, हे आंदोलन दडपण्याचा प्रकार महाविकास आघाडीकडून केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. जिल्ह्यातील नगरपंचायतीमधील भ्रष्ट्राचार, भूकंप बाधितांना नुकसान भरपाई द्यावी, कुपोषण, शेतीविषयक मागण्या आदींवर हे आंदोलन होत आहे.

हेही वाचा - अहमदनगर तहसील कार्यालयात बेकायदेशीर वृक्षतोड; महानगरपालिकेने केला पंचनामा

माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. याआधी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मनाई आदेश नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरी हे आंदोलन होणारच, असा ठाम निर्धार भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जणाठे यांनी करून कार्यकर्त्यांनी जसे जमेल तसे आंदोलनास पोहचावे, असे आवाहन केले आहे. 20 नोव्हेंबरला सकाळी 11 च्या सुमारास हे आंदोलन पालघरच्या हुतात्मा चौकातून पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या या मोर्चाआधीच पोलिसांकडून ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड झाली.

जिल्ह्यात जमावबंदी लागू असल्याने खबरदारी म्हणून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा - मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 50 लाखांची मदत; सरकारला आली जाग

Last Updated : Nov 20, 2020, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.