ETV Bharat / state

चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

author img

By

Published : Oct 26, 2019, 12:37 PM IST

पालघर जिल्ह्यातही क्योर चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

किनाऱ्यावरील मच्छिमार बोटी

पालघर - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. यामुळे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातही क्योर चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात क्योर चक्रीवादळाचा प्रभाव पाहता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्यातही क्योर चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता

पालघरमधील मत्स्यव्यवसाय विभागाच्या 1 हजार 411 बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या होत्या. त्यापैकी 1 हजार 378 बोटी समुद्रकिनारी परतल्या आहेत. 33 बोटी समुद्रात असून त्यांनाही समुद्र किनारी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासनामार्फत त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - क्योर चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा

पालघर जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने भात शेतीच्या कापणीची काम करू नये. पावसामुळे कापणी झालेल्या भातशेतीचे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. वादळामुळे शेतीचे नुकसान झाले तर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले.

Intro:पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीसह क्यार चक्रीवादळाचा प्रभाव पाहता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच मच्छीमारांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये; जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदेBody:   पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीसह क्यार चक्रीवादळाचा प्रभाव पाहता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच मच्छीमारांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये; जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

नमित पाटील,
पालघर, दि.26/10/2019 

     पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीसह क्यार  चक्रीवादळाचा प्रभाव पाहता नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच मच्छीमारांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे  यांनी केले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीसह क्यार चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्या मार्फत वर्तविण्यात आली आहे. 

      सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंतर्गत 1411 बोटी समुद्रात मासेमारीकरीता गेल्या होत्या.  त्यापैकी 1378 बोटी या समुद्रकिनारी आल्या आहेत. आतापर्यंत 33 बोटी समुद्रात असून त्यांनाही समुद्र किनारी परत येण्याचे या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनामार्फतही त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्र किनारी असलेल्या बोटींपैकी 7 बोटी दिव येथे तर 2 बोटी जाफ्राबाद येथे सुखरुप पोहचल्या आहेत.  

      जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने असलेल्या भात शेतीच्या कापणीची काम करू नये अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पावसामुळे झालेल्या भातशेतीचे तसेच वादळीवाऱ्यामुळे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचे योग्य पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल असे आश्वासनही जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी  दिले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.