वसई (पालघर) - विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तीचे अश्लील व्हिडिओ काढत ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला आहे. नायगावमध्ये ही घटना घडली. तरुणाचे नाव मनोज थोरात असे असून तो मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात राहत होता.
संबंधित तरुण गेल्या काही दिवसांपासून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवायचा, तीचा पाठलाग करायचा, ब्लॅकमेल करायचा आणि मानसिक त्रास देत होता. अखेर महिला त्रासाला कंटाळून मुंबईहून नायगाव येथे कुटुंबासोबत राहण्यासाठी आली. मात्र, तरुण नायगावमध्ये येऊन महिलेला त्रास देत होता.
पीडित महिलेची मनसेकडे तक्रार -
अखेर महिलेने मनसे पदधिकारी प्रफुल्ल कदम यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. यावर प्रफुल्ल कदम आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅप करत तरुणाला पकडले. नायगाव स्थानकावर तरुणाला बेदम चोपले आणि पोलिसांकडे सोपवले. त्रासापासून सुटका केल्याने पीडित महिलेने मनसेसैनिकांचे आभार मानले.
हेही वाचा - VIDEO : महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या माथेफिरुला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण; कुर्ला येथील घटना