पालघर - वनपाल दिनेश नितीन शिवदे याला १३ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. सोमटा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे वनहक्क समिती आंबेदे गावचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह गावातील इतर दावेदारांच्या जमिनीचा जीपीएस सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी शिवदे याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत विभागाने याबाबतची पडताळणी केली.
लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता १३ हजार रुपये घेताना दिनेश नितीन शिवदे याला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती लाचलुचपत विभागामधील सूत्रांनी दिली आहे.