ETV Bharat / state

वसई तालुक्यात रिमझिम पाऊस; ऐन हिवाळ्यात मिळतोय पावसाचा अनुभव

author img

By

Published : Dec 13, 2020, 10:00 AM IST

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यातील वातावरणावर याचा परिणाम दिसू लागला आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

Rain
पाऊस

पालघर : वसई तालुक्यातील सर्व भागात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे थंडीत वसईकरांना पावसाचा अनुभव मिळत आहे. त्यामुळे थंडीत घातल्या जाणाऱ्या स्वेटरऐवजी नागरिकांना घराबाहेर पडताना छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहरात पावसाच्या सरी बरसत आहेत. ढगाळ वातावरणासह हवेत गारवा वाढला आहे. शहरी व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फटका आता कोळी बांधवांना बसू लागला आहे. मासे सुकवण्याच्या प्रक्रियेवर पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. अर्नाळा समुद्रकिनारी सुकण्यासाठी टाकलेल्या बोंबील, जवळा सारख्या सुक्या मासळीवर पावसाचे पाणी पडत असल्याने आता मासळी कुजू लागली आहे.

विटभट्टी व्यावसायिकांना फटका -

किनारपट्टी आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर सुकण्यासाठी टाकलेली मासळी व विटभट्टी व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. आणखी जोराचा पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये येत्या काही तासात वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.