नाशिक - मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बाजीराव सांगळे असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये 'सोलार ट्री'च्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा संदेश
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या मुलीला मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास संशयित बाजीराव सांगळे याने त्या मुलीला तुला मैत्रिणीने बोलावले आहे, असे सांगून सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर अत्याचार करत तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी म्हसरुळ पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली होती. त्यानंतर संशयित आरोपी बाजीराव सांगळे याला गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, हवालदार संजय राऊत, सुरेस माळोदे, किशोर रोकडे, मंगेश दराडे यांनी सापळा रचून ताब्यात घेतले व त्याला अटक केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.