ETV Bharat / state

रविना टंडन, फराह खान आणि भारती सिंगवर गुन्हा दाखल करा; ख्रिश्चन बांधवांची मागणी

author img

By

Published : Dec 29, 2019, 5:13 PM IST

एका टीव्ही चॅनलच्या कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी बायबलमधील 'हालेलुया' या पवित्र शब्दाचा गैर अर्थ लावल्याची तक्रार ख्रिश्चन बांधवांची आहे. या विरोधात रविवारी मनमाड कॅम्प भागातून धर्मगुरू संदीप वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

ख्रिश्चन बांधवांचा मोर्चा
ख्रिश्चन बांधवांचा मोर्चा

नाशिक - एका टीव्ही चॅनलवरील कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. मनमाडमध्येही ख्रिश्चन बांधवांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून तिघींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वरिष्ठांशी चर्चा करून त्यांचा निर्णय आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले.

मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांचा मोर्चा

एका टीव्ही चॅनलच्या कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी बायबलमधील 'हालेलुया' या पवित्र शब्दाचा गैर अर्थ लावल्याची तक्रार ख्रिश्चन बांधवांची आहे. या विरोधात रविवारी कॅम्प भागातून धर्मगुरू संदीप वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना निवेदन देण्यात आले. 'हालेलुया' हा शब्द बायबलमध्ये असून तो आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. मात्र, या तिघींनी या शब्दाचा अवमान केल्यामुळे समस्त ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या मोर्चात ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा - Flashback 2019 : टिक टॉकच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले 'हे' चेहरे

या मोर्चानंतर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. या नंतर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार असतील, असा इशारा ख्रिस्ती बांधवांतर्फे देण्यात आला. दरम्यान, अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांच्यावर बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:मनमाड: एका टीव्ही चॅनलवरील कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन, फराह खान, भारती सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मनमाडला उमटले असुन आज सकाळी चर्च संपल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून तिन्ही अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी इथे गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले मात्र गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी मोर्चेकऱ्यांनी लावून धरली त्यामुळे आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या निर्णय आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन कुटे यांनी दिले
 Body:- एका टीव्ही चॅनलच्या कॉमेडी शोमध्ये सिने अभिनेत्री रविना टंडन,फराह खान,भारती सिंग यांनी बायबल मधील हालेलुया या पवित्र शब्दाचा गैर अर्थ लावल्याचे पडसाद बीड पाठोपाठ आज मनमाड शहरात देखील उमटले असून संतप्त झालेल्या ख्रिश्चन बांधवानीपोलीस स्टेशनवर मोर्चा काढून तिन्ही अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.कैम्प भागातून धर्मगुरू संदीप वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून जावून हा मोर्चा पोलीस स्थानकात आल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना निवेदन देण्यात आले त्यात हालेलुया हा शब्द बायबल मध्ये असून तो आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे मात्र तिन्ही अभिनेत्रींनी या शब्दाचा अवमान केल्यामुळे समस्त ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या आहे त्यामुळे या तिन्ही अभिनेत्रीवर  कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव व भगिनी सहभागी झाले होते  
 
बाईट- संदीप वाघमारे,धर्मगुरू
 आमिन शेख,मनमाड Conclusion:आजच्या मोर्चा नंतर दोन दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा ईशारा ख्रिस्ती बांधवांतर्फे देण्यात आला असुन या नंतर काही अघटित घडले तर त्यास सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार असतील असेही यावेळी सांगण्यात आले आहे .आज मोर्चासाठी सर्व ख्रिश्चन बंधू आणि बघिनीनि हजेरी लावली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.