ETV Bharat / state

दादा, तुम्ही विधानसभेचे विराट कोहली आहात.., रोहित पवारांच्या फटकेबाजीवर कार्यकर्त्यांची कमेंट

author img

By

Published : Dec 27, 2020, 10:36 PM IST

रोहित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. खुद्द आमदार आपल्यासोबत क्रिकेट खेळत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झाला.

MLA Rohit Pawar enjoyed playing cricket during his visit to Nashik
दादा, तुम्ही विधानसभेचे विराट कोहली आहात.., रोहित पवारांच्या फटकेबाजीवर कार्यकर्त्यांची कमेंट

नाशिक - आमदार रोहित पवार यांची तरुणांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. याचा प्रत्यय आज नाशिकमध्ये पाहायला मिळाला. रोहित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. खुद्द आमदार आपल्यासोबत क्रिकेट खेळत असल्याचे पाहून कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झाला.

आमदार रोहित पवार हे आज छगन भुजबळांकडे पालकत्व असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांचे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. विहितगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना रस्त्यातच थांबवून त्यांचा सत्कार केला. तेव्हा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या हातात बॅट-बॉल पाहिले आणि त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.

तेव्हा रोहित पवारांनी एका कार्यकर्त्यांच्या बुलेटवर बसत ते थेट विहितगाव येथील महापालिकेचे मैदान गाठले. आपले पक्षीय कार्यक्रम बाजूला सारत त्यांनी जवळपास अर्धा तास क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. विशेष बाब म्हणजे, रोहित पवार यांनी आक्रमक फलंदाजी केली. त्यांनी गोलंदाजी फोडून काढत टोलेजंग फटके लगावले. तेव्हा, दादा तुम्ही विधानसभेचे टॉपर फलंदाज असल्याचे कमेंट कार्यकर्त्याने केली. तर एकाने, दादा, तुम्ही विधानसभेचे विराट कोहली असल्याचे सांगितले.

रोहित पवार क्रिकेट खेळताना...

दरम्यान, रोहित पवार यांनी एकामागोमाग एक षटकार ठोकत कार्यकर्त्यांची मनं जिंकली. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज बारामतीमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या ठिकाणी आज अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना बॅटिंग करण्याचा आग्रह केला. तेव्हा अजित पवारांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

हेही वाचा - पार्थच्या उमेदवारीचा निर्णय स्थानिक नेतृत्त्व घेईल - रोहित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.