ETV Bharat / state

मंगला अन् तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

author img

By

Published : Jan 18, 2020, 10:14 PM IST

तपोवन एक्सप्रेसच्या बोगीच्या स्प्रिंग निकामी झाली तर मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमधून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रेल्वेचे तांत्रिक पथक येऊन पाहणी व दुरुस्ती करेपर्यंत तपोवन एक्सप्रेस तब्बल दीड तास लेट झाली. तर मंगला एक्सप्रेसला देखील वीस ते पंचवीस मिनिटे खोळंबा झाला.

nashik
मंगला अन् तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रीक बिघाड; दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नाशिक - मनमाड रेल्वे स्थानकात शनिवार सायंकाळी नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम-दिल्ली मंगला एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही गाड्या काही वेळासाठी स्थानकातच उभ्या असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तपोवन एक्सप्रेसच्या बोगीच्या स्प्रिंग निकामी झाली तर मंगला एक्सप्रेसच्या इंजिनमधून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. रेल्वेचे तांत्रिक पथक येऊन पाहणी व दुरुस्ती करेपर्यंत तपोवन एक्सप्रेस तब्बल दीड तास लेट झाली. तर मंगला एक्सप्रेसला देखील वीस ते पंचवीस मिनिटे खोळंबा झाला.

हेही वाचा - 'देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज'

तपोवन एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात आल्यानंतर या गाडीच्या एका बोगीच्या स्प्रिंग तुटल्याने या गाडीचा खोळंबा झाला. अचानक रेल्वे डब्ब्याला काय झाले? या शंकेने प्रवासी धास्तावले. मात्र, रेल्वेच्या तांत्रिक पथकाने स्प्रिंग तुटलेला डबा गाडीपासून वेगळा केला. यामध्ये सुमारे दीड तास गाडीला विलंब झाला. यानंतर हा गाडी मुंबईकडे मार्गस्थ झाली. तर दिल्लीकडे जाणाऱ्या धावत्या मंगला एक्स्प्रेसच्या एका डब्यातून धूर निघाल्याचे पाहून प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. यावेळी डब्ब्याला आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले होते. महिला प्रवाशांनी तर आरडाओरडा केला. एका प्रवाशाने साखळी ओढून गाडी थांबवली.

हेही वाचा - पहिल्याच बैठकीत पालकमंत्री भुजबळ संतप्त, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

गाडी थांबताच प्रवाशांनी डबा रिकामा केला. डब्ब्याचे ब्रेक जाम झाल्यामुळे धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. गाडी मनमाडला आल्यानंतर ब्रेकची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर गाडी दिल्लीकडे रवाना झाली. या प्रकारामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, रेल्वेमध्ये या घटनेमुळे प्रवाशांना प्रंचंड मनस्ताप झाला असून असे प्रकार रोखण्याचे कडक उपाय रेल्वे प्रशासनाने करण्याची मागणी प्रवाशांनी केली.

Intro:मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड रेल्वे स्थानकात नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस च्या बोगीच्या स्प्रिंग निकामी झाली तर एर्नाकुलम दिल्ली मंगला एक्सप्रेस च्या इंजिन मधून धूर निघाल्याने प्रवासी वर्गात घबराट पसरली , या दोन्ही घटना आज (शनिवार)सायंकाळी घडल्या .या प्रकारामुळे रेल्वेचे तांत्रिक पथक येऊन पाहणी व दुरुस्ती करे पर्यंत तपोवन एक्सप्रेस तब्बल दीड तास लेट झाली.तर मंगला एक्सप्रेसला देखील वीस ते पंचवीस मिनिटे खोळंबा झालाBody:शनिवार सायंकाळी नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकात आल्या नंतर या गाडीच्या एका बोगीच्या स्प्रिंग तुटल्याने रेल्वेला खोळंबा झाला, अचानक रेल्वे डब्ब्याला काय झाले?या शंकेने प्रवासी धास्तावले, मात्र मनमाड स्थानकात रेल्वेचे  तांत्रिक पथक येऊन पाहणी करून गेले, त्यावेळी सदर स्प्रिंग तुटलेला डबा गाडी पासून वेगळा करण्यात आला आणि सुमारे दीड तास गाडीला विलंब होऊन नंतर ती मुंबईकडे मार्गस्थ झाली .तर दिल्लीकडे जाणारी धावत्या मंगला एक्स्प्रेसच्या एका डब्यातून धूर निघाल्याचे पाहून प्रवाशांमध्ये भीती खळबळ उडाली. बोगीत आग लागल्याची अफवा पसरली त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती.महिला प्रवाशांनी तर आरडाओरडा केला.एका प्रवाशाने साखळी ओढून गाडी थांबवली.गाडी थांबताच प्रवाशांनी डबा रिकामा केला.डब्याचे ब्रेक जाम झाल्यामुळे धूर निघत होता असे समजल्या नंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला गाडी मनमाडला आल्यानंतर ब्रेकची दुरुस्ती करण्यात आल्यावर गाडी दिल्लीकडे रवाना झाली.या प्रकारामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागलाConclusion:.दरम्यान रेल्वे मध्ये घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असून असे प्रकार रोखण्याचे कडक उपाय रेल्वे प्रशासनाने योजावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.