येवला ( नाशिक ) - राज्यात मागच्या गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. गेल्या 5 दिवसांपूर्वी येवला परिसरामध्ये संततधार पावसामुळे सर्वत्र पिकांची धूळधाण करून टाकली असून आता पावसानंतर दाट धुके पसरले असून आता दाट धुक्यामुळे ( FOG IN YEOLA )जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र येवलामध्ये दिसत आहे. या धुक्यामुळे द्राक्षे बाग, कांदा सह रब्बीच्या पिकांना फटका बसणार असल्यामुळे बळीराजा चिंतेत झाला आहे.
एरवी जम्मू काश्मीर आणि नैसर्गिक सौंदर्यसाठी ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वरात दिसणारे धुक्याचे नयन रम्य दृश्य सध्या येवलासह नाशिकच्या ग्रामीण भागात दिसत आहे. सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली असून धुके इतके दाट आहे की समोरचे काही दिसत नसल्यामुळे वाहन चालविताना वाहन धारकांची तारांबळ उडत आहे. गेल्या 5 दिवसांपूर्वी येवला परिसरामध्ये संततधार पावसामुळे सर्वत्र पिकांची धूळधाण करून टाकली असून आता पावसानंतर दाट धुके पसरले आहेत. या धुक्याचा फटका द्राक्षे बाग, कांदा रोप यासह रब्बीच्या पिकांना बसणार असल्यामुळे बळीराजापुढे अजून एक नवे संकट उभे राहिले आहे.
महागडी औषधे फवरण्याची वेळ -
कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्याला सतत कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अगोदरच मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या वतीने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्याने कांदा पिकावर मरकुज, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला. सध्या पाऊस उघडला असला तरी येवला तालुक्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा पिकाला याचा फटका बसत आहे. कांद्यावर महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर येत आहे.