ETV Bharat / state

नाशिक; बाळासाहेब सानप यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.

author img

By

Published : Jan 12, 2021, 8:48 AM IST

मागील पंचवार्षिक निवडणुकीत सानप यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी व्हाया शिवसेना असा प्रवास केला. पण मन न रमल्याने त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आली आहे.

बाळासाहेब सानप यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.

नाशिक- शिवसेनेला सोडचिठ्ठी देत दोन आठवड्यांपूर्वी भाजपात परतलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर भाजपाने उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सानप यांना नियुक्तीचे पत्र दिले. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सेनेतून भाजपात प्रवेश..
मागील आठवड्यात माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागूल यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन दिग्गज नेत्यांनी दिलेली सोडचिठ्ठी भाजपासाठी मोठा धक्का होता. त्यानंतर पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेत आणखी पडझड होऊ नये यासाठी सानप यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेना आता पुन्हा भाजपात-

सानप भाजपाच्या तिकीटावर 2014 मध्ये नाशिक पूर्व मधून आमदार झाले. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचा भाजपाचे राहुल ढिकले यांनी पराभव केला. त्यानंतर सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता .सानप यांना पक्षाचा कार्याचा दांडगा अनुभव असून त्यांनी वीस वर्ष नगरसेवक पद, गटनेता ,स्थायी समिती सदस्य ,उपमहापौर व महापौरपद असा प्रवास केला आहे या अनुभवाच्या जोरावर त्यांनी आमदारकी देखील भूषवली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सानप यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी व्हाया शिवसेना असा प्रवास केला. पण मन न रमल्याने त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर लगेच त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आणू...
आगामी काळात पक्षवाढीसाठी प्रयत्न करेल संघटना मजबूत आहेच ती अधिक मजबूत होण्यासाठी काम करू. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आणून 100 हून अधिक नगरसेवक आणू असा विश्वास बाळासाहेब सानप प्रदेश उपाध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.