ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यातील मंदाणा गावाची स्वयंशिस्त; तरुणांचा गावाच्या सीमेवर पहारा

गावातील युवकांनी एकत्र येत गावाच्या सिमेवर नाकाबंदी केली आहे. प्रत्येक युवकाकडून गावाच्या सिमेवर २ तास पहारा दिला जात आहे. त्यांच्यासोबत गावातील आरोग्य केंद्रातील कर्मचारीही असतात, ते गावात येणाऱ्यांची तपासणी करतात व गावात दररोज फवारणी करतात.

mandana nandurbar
मंदाणा गावातील दृश्य
author img

By

Published : Apr 6, 2020, 11:10 AM IST

नंदुरबार- कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. मात्र, काही नागरिक या संचारबंदीचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्यांच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र, काही नागरिक असेही आहेत जे आपली सामाजिक जबाबदारी समजून कायद्याचे पालन करत आहेत. जिल्ह्यातील मंदाने या गावातील ग्रामस्थांकडून संचारबंदीचे पूर्णपणे पालन केले जात आहे. युवकांकडून गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात.

माहिती देताना मंदाणाचे आरोग्या अधिकारी डॉ. विशाल पाटील

गावातील युवकांनी एकत्र येत गावाच्या सिमेवर नाकाबंदी केली आहे. प्रत्येक युवकाकडून गावाच्या सिमेवर २ तास पहारा दिला जात आहे. त्यांच्यासोबत गावातील आरोग्य केंद्रातील कर्मचारीही असतात, ते गावात येणाऱ्यांची तपासणी करतात व गावात दररोज फवारणी करतात. तसेच, वाहनावर स्पीकर लावून जनजागृती केली जाते, गावातील कोणीही कामाशिवाय बाहेर येत नसून गावकऱ्यांनी स्वताला स्वयंशिस्त लावली आहे. ग्रामीण भागातील महिला आपली दैनदिन कामे मास्क लावून करत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी स्वत:ला संपूर्णरित्या झोकून दिले आहे. त्यांच्याकडून स्वताच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे, तसेच कायद्याचे पालन देखील केले जात आहे. त्याउलट शहरातील काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. कोरोना विषाणूबाबत ही लोक अद्याप गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. अशा वेळेस मंदाणा गावातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून उच्च शिक्षित लोकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

हेही वाचा- नियमांची ऐशी-तैशी! लॉकडाऊनमध्ये नवापूरात भरला ‘आठवडी बाजार’

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.