ETV Bharat / state

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मौलवीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एक ते दीड वर्षापूर्वी सदर मौलवीने आपल्या रूममध्ये त्या अल्पवयीन मुलीस काही पुस्तके आणण्यास पाठवून दिले. त्यानंतर लगेचच त्याने तिच्या पाठोपाठ जाऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची व्हिडिओ आणि फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले. नंतर सदर व्हिडिओ क्लीप व्हायरल करतो, असे धमकावत मौलवीने मुलीवर वारंवार अत्याचार केला.

Nanded
मौलवीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Mar 16, 2020, 9:49 AM IST

Updated : Mar 16, 2020, 10:02 AM IST

नांदेड - शहरातील हुजुरगंज मशिदीत अरबी भाषा शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अरबी शिकविणाऱ्या मौलवीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मौलवी शेख एजाज शेख नबीसाब (वय - 27 रा. पाळा तालुका मुखेड) याच्यावर देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील एक मुलगी अरबी भाषा शिकण्यासाठी हुजूरगंज मशिदीत दररोज सकाळी व सायंकाळी जात होती. येथे मौलवी या मुलीला अरबी भाषा शिकवत होता. एक ते दीड वर्षापूर्वी सदर मौलवीने आपल्या रूममध्ये त्या अल्पवयीन मुलीस काही पुस्तके आणण्यास पाठवून दिले. त्यानंतर लगेचच त्याने तिच्या पाठोपाठ जाऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची व्हिडीओ आणि फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले. नंतर सदर व्हिडिओ क्लीप व्हायरल करतो, असे धमकावत त्याने मौलवीने मुलीवर वारंवार अत्याचार केला.

हेही वाचा - नांदेडमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयासह कोचिंग क्लास बंद ठेवण्याचे आदेश

या गुन्ह्यात नराधम शेख एजाज यास शफी मौलाना (रा. भायगाव रोड) आणि शेख मुनीर छोटेमिया (रा.दर्गा रोड) हे दोघे मदत करत होते. दरम्यानच्या कालावधीत पीडित मुलगी आजारी पडत असल्यामुळे तिच्या आईने तब्येतीविषयी विचारपूस केली असता, पीडितीने तिच्यावर घडलेला प्रसंग कथन केला.

यानंतर मुलीच्या वडिलांनी शेख एजाजला जाब विचारला असता, तुमच्या मुलीचे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत. तुमची बदनामी वाचवायची असेल, तर माझ्यासोबत लग्न लावून द्या, असे म्हणत तो त्या मुलीसोबत तो विवाहबद्ध झाला. विवाहानंतर 2 ते 3 महिन्याने त्या मुलीचा शेख एजाज व त्याच्या घरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे पीडितेने व तिच्या वडिलांनी देगलूर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्यासमोर कैफियत मांडली. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शेख एजाज व त्याच्या 2 साथीदाराविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - विष्णूनगर भागात घरफोडी, 35 तोळे चांदीसह 3 लाखांचा ऐवज लंपास

Last Updated : Mar 16, 2020, 10:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.