ETV Bharat / state

मराठवाड्यावर पाऊस रुसला; नांदेड जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरण्या.... - पावसाळा

गेल्या चार वर्षांपासून नांदेड जिल्हा दुष्काळाचे चटके सोसत आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात सर्वसाधारण पाऊस झाला असला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. निम्म्यापेक्षा तालुक्यात पेरणी केवळ नावालाच झाली आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:06 PM IST

Updated : Jul 4, 2019, 11:55 PM IST

नांदेड - मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले. पण, मराठवाड्यावर पाऊस मात्र चांगलाच रुसला आहे. शेतकरी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जमिनीची तहान अजूनही भागली नाही. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटत असतानाही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

माहिती देताना प्रतिनीधीसह शेतकरी

गेल्या चार वर्षांपासून नांदेड जिल्हा दुष्काळाचे चटके सोसत आहे. यावर्षीही पावसाने दगा दिला असून अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात सर्वसाधारण पाऊस झाला असला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.

अनेक तालुक्यात कमी पाऊस झाल्याने जमिनीची तहानच अजून भागली नाही. पिण्याच्या पाण्याचीच समस्या अजून सुटली नाही. निम्म्यापेक्षा तालुक्यात पेरणी केवळ नावालाच झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ८ लाख २४ हजार ८१९ इतके खरिपाचे पेरणीलायक क्षेत्र आहे. आतापर्यंत केवळ २ लाख २७ हजार २०२ हेक्टर क्षेत्रावरच खरिपाची पेरणी झाली आहे. मूग आणि उडीद ही पिके पेरण्याचे शेतकऱ्यांनी बंदच केले आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात यावर्षी पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पेरणीला एक महिना उशीर झाला असून काही भागातील शेतकरी जमिनीत पुरेशी ओल नसतानाही पाणी पडेल, या आशेने पेरणी करत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाचे चक्र साथ सोडत नसून दिवसेंदिवस दुष्काळाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील पेरणी झालेली आकडेवारी

  • नांदेड २६ . ९७ टक्के
  • अर्धापूर २६.९७ टक्के
  • मुदखेड ०.३४ टक्के
  • लोहा १५ . ५२ टक्के
  • कंधार ३३ . ८४ टक्के
  • देगलूर १ . १६ टक्के
  • मुखेड १ . २९ टक्के
  • नायगांव ४ . ८२ टक्के
  • बिलोली १० . ९६ टक्के
  • धर्माबाद १६ . ६२ टक्के
  • किनवट ५२ . ६७ टक्के
  • माहूर ५१ . ९८ टक्के
  • हदगांव ३८ . १७ टक्के
  • हिमायतनगर ६३. ५८ टक्के
  • भोकर २८. ४३ टक्के
  • उमरी ४९. ७० टक्के
  • एकुण २७. ५५ टक्के

Intro:मराठवाड्यावर पाऊस रुसला.;
नांदेड जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरण्या....!

नांदेड: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले. पण मराठवाड्यावर पाऊस मात्र चांगलाच रुसला आहे. शेतकरी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जमीनीची तहान अजूनही भागली नाही. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटत असतानाही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. नांदेड जिल्ह्यात केवळ आतापर्यंत २७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.Body:मराठवाड्यावर पाऊस रुसला.;
नांदेड जिल्ह्यात केवळ २७ टक्केच पेरण्या....!

नांदेड: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले. पण मराठवाड्यावर पाऊस मात्र चांगलाच रुसला आहे. शेतकरी पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. जमीनीची तहान अजूनही भागली नाही. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटत असतानाही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. नांदेड जिल्ह्यात केवळ आतापर्यंत २७ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.
गेल्या चार वर्षांपासून नांदेड जिल्हा दुष्काळाचे चटके सोसतोय. यावर्षीही पावसाने दगा दिला असून अद्यापपर्यंत अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात सर्वसाधारण पाऊस झाला असला तरी पेरणी योग्य पाऊस झाला नाही.
अनेक तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला. जमिनीची तहानच अजून भागली नाही. पिण्याच्या पाण्याचीच समस्या अजून सुटली नाही. निम्म्यापेक्षा तालुक्यात पेरणी केवळ नावालाच झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार ८ लाख २४ हजार ८१९ इतके खरिपाचे पेरणीलायक क्षेत्र असून आतापर्यंत केवळ २ लाख २७ हजार २०२ हेक्टर क्षेत्रावरच खरिपाची पेरणी झाली आहे. मूग आणि उडीद ही पिके पेरण्याचे शेतकऱ्यांनी बंदच केले असून सोयाबीनच्या क्षेत्रात यावर्षी पुन्हा वाढ होण्याची चिन्हे आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पेरणला एक महिना उशीर झाला असून काही भागातील शेतकरी जमिनीत पुरेशी ओल नसतानाही पाणी पडेल या आशेने हिमतीवरच पेरणी करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील दुष्काळाचे चक्र साथ सोडत नसून दिवसेंदिवस दुष्काळाची परिस्थिती भीषण होत चालली आहे. शेतकऱ्यांनी आकाशाकडे पाहून पाहून डोळ्यातीलही पाणी आटून गेले आहे.
त्यामुळे आगामी काळात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील पेरणी झालेली आकडेवारी
-------------------------
नांदेड २६ . ९७
अर्धापूर २६.९७
मुदखेड ०.३४
लोहा १५ . ५२
कंधार ३३ . ८४
देगलूर १ . १६
मुखेड १ . २९
नायगांव ४ . ८२
बिलोली १० . ९६
धर्माबाद १६ . ६२
किनवट ५२ . ६७
माहूर ५१ . ९८
हदगांव ३८ . १७
हिमायतनगर ६३. ५८
भोकर २८. ४३
उमरी ४९. ७०
एकुण २७. ५५Conclusion:
Last Updated : Jul 4, 2019, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.