नागपूर - ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस, हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या आनंदाने साजरा करतात. यामुळे १४ फेब्रुवारीला प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाच्या फुलांना जास्त मागणी असते. मात्र, यंदा गुलाबाच्या किमतीत तिपटीने वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
व्हॅलेंटाईन दिवशी गुलाबाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, या दिवशी प्रत्येक प्रियकर आपल्या प्रियसीला गुलाबाचे फूल देत आपले प्रेम व्यक्त करतो. मात्र, एरवी बाजारात केवळ १० रुपयांना मिळणारे गुलाबाचे फूल हे या व्हॅलेंटाईन डे ला २५ ते ३० किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीने विकले जात आहे.