ETV Bharat / state

दुःखद.. दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू; नागपूरच्या कुही तालुक्यातील घटना

author img

By

Published : Oct 4, 2020, 2:03 PM IST

काल दुपारी ते साळवा तलावाजवळून जात असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही. तलाव खोल असून तिथे धोका आहे, असे सांगून एका गुराख्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आधी लहान भाऊ पाण्यात आतपर्यंत गेल्याने बुडाला आणि त्याला वाचवताना दुसऱ्याचाही मृत्यू झाला.

दोन सख्ख्या भावांचा बुडाल्याने मृत्यू
दोन सख्ख्या भावांचा बुडाल्याने मृत्यू

नागपूर - जिल्ह्यातील कुही तालुक्यात साळवा तलावात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सनी साहू (वय 19) आणि वीरेंद्र साहू (वय 17) अशी मृत तरुणांची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ होते. दोघे गावागावांत फिरून जुन्या वस्तू/भंगार खरेदी करत होते.

हेही वाचा - मंत्रालयातील उच्च पदस्थ व्यक्तीचा पत्नीवर बलात्कार; गुन्हा दाखल

काल दुपारी ते साळवा तलावाजवळून जात असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही. तलाव खोल असून तिथे धोका आहे, असे सांगत एका गुराख्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आधी लहान भाऊ पाण्यात आतपर्यंत गेल्याने बुडाला आणि त्याला वाचवताना दुसऱ्याचाही मृत्यू झाला.

संध्याकाळपर्यंत दोघे न परतल्यामुळे त्यांचा शोध सुरू झाला, तेव्हा ही घटना समोर आली. नंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोघे भाऊ नागपूरमधील कळमना भागातले रहिवाशी होते.

हेही वाचा - मिठाईवर एक्सपायरी टाकण्यासंदर्भात दुकानदारांमध्ये संभ्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.