नागपूर: आयकर विभागाच्या पथकांकडून नागपूरातील तीन मोठ्या उद्योगांच्या कार्यालयांवर (Income Tax Raid On Industries) 12 जागी धाडी (Income tax department raids and searched) टाकण्यात आल्या आहेत. विठोबा ग्रुप, पिनॅकल ग्रुप आणि मगनमल हिरामल ग्रुपच्या कार्यालयात सर्च सुरू असल्याचे समोर आले आहे. धाडी टाकताना आयकर विभागाकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. Income Tax Department raid Nagpur, Nagpur Crime, Latest news from Nagpur
कोट्यवधींची संपत्ती समोर येण्याची शक्यता - एकाच वेळी नागपूरमध्ये असलेल्या या तिन्ही उद्योगांशी संबंधित 12 ठिकाणांवर धाडसत्र सुरू आहे. तिन्ही कंपन्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे समजते. आयकर विभागाची कारवाई दोन दिवस चालेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईतून कोट्यवधी रुपयांची अघोषित संपत्ती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपनीय कारवाई : आयकर विभागाला एखाद्या ठिकाणी धाड टाकायची असेल तर अधिकाऱ्यांना सकाळीच हजर व्हायला सांगितले जाते. मात्र, आजच्या कारवाईपूर्वी अशी कोणतीही सूचना कुणालाही देण्यात आली नव्हती.
तीन उद्योग समूहाच्या 12 ठिकाणी धाडी : आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळी पिनॅकल ग्रुपच्या ८ ठिकाणी, विठोबा ग्रुपच्या २ ठिकाणी आणि मगनमल हिरामल ग्रुपच्या २ ठिकाणांवर धाडी टाकल्या. पिनॅकल ग्रुप टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि मेसेजिंग सर्व्हिसेस क्षेत्रात कार्यरत आहे. पिनॅकल ग्रुपचे कार्यालय गुडगावमध्ये आहे. विठोबा ग्रुपच्या नागपूरमधील एमआयडीसी स्थित असलेल्या फॅक्टरी आणि तीन पाटर्नसच्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. विठोबा उद्योग समूहाला माल पुरवठा करणारी फर्म मगनमल हिरामलच्या घरासह आणि इतवारी स्थित असलेल्या दुकानावरही आयकर विभागाने कारवाई केली.