नागपूर : दत्तात्रय जोशी नामक व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे, अशी खोटी पोस्ट लिहिणाऱ्यांवर आणि ती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती सायबर पोलीसांना करण्यात आली आहे. दत्तात्रय जोशी नामक एका व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नितीन गडकरी यांच्या नावे काही आक्षेपार्ह मजकूर ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ वर पसरवली जात असल्याची माहिती त्यांना समजताच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अद्याप पोलिसांनी दत्तात्रय जोशी यांना ताब्यात घेतले की नाही, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
कसबा पोटनिवडणुकीतही फेक पोस्ट व्हायरल : कसबापेठ पोट निवडणुकीत सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावावे पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. याबाबत केंद्रिय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाने बनावट पोस्ट असल्याचा खुलासा केला होता. निकालानंतर गडकरींनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्याच्या उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या खोडसाळपणाबद्दल देखील काही दिवसांपूर्वी नितीन गडकरीकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गडकरी यांच्या नावाने अशा प्रकारे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे, असे नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ट्विटरवरून स्पष्ट केले होते. या प्रकरणी नितीन गडकरी यांनी ट्वीट करून झालेला प्रकार सांगितला होता.
सामाजिक सलोखा बिघडण्याची दाट शक्यता : या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेली पोस्ट ही विशिष्ट समाजाला चिथावणी देणारी आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही पोस्ट व्हायरल व तयार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खूप गंभीर बाब आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
हेही वाचा : Nitin Gadkari Gorakhpur : नितीन गडकरी देणार दहा हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांची भेट!