ETV Bharat / state

Jitendra Awad Arrested : दबावापोटी आव्हाडांना अटक; सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

author img

By

Published : Nov 11, 2022, 6:37 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र अव्हाड यांना अटक ( Jitendra Awad Arrested ) केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी निषेध केला आहे.

Supriya Sule
Supriya Sule

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad arrested ) यांना ठाण्यामध्ये पोलिसांनी आज अटक ( Leader Jitendra Awad arrested in Thane ) केली. हर हर महादेव चित्रपट ( Har Har Mahadev Movie ) पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा ठपका ठेवत जितेंद्र आव्हाड यांना वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या अटकेचा तीव्र निषेध केला आहे.

दबावापोटी आव्हाडांना अटक; सुप्रिया सुळे

पोलिसांनी दबावापोटी अटक केली - जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी दबावापोटी अटक केली आहे. मात्र हा दबाव नेमका पोलिसांवर कोणाचा आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच 'हर हर महादेव' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास प्रेक्षकांसमोर दाखवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला जात असताना त्याचा विरोध करताना जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली आहे. या अटकेचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला जाऊ नये यासाठी विरोध करताना आम्हालाही अटक झाली. तर, आम्हाला त्याचा अभिमान असेल. अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांचेही समर्थन सुप्रिया सुळे यांनी केल आहे. चुकीचा इतिहास दाखवला जाऊ नये यासाठी आम्ही जेलभरो आंदोलन करू असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांची टीका - चौकशी करण्यासाठी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना तुरुंगात बोलवलं होतं मात्र कोणतीही चौकशी न करता त्यांना अटक करण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड यांनी जर काही चुकीचं केलं असलं तरी पण संविधानाने त्यांना त्यांची बाजू ठेवण्याचा अधिकार दिला आहे मात्र सध्या पोलीस दबावाखाली काम करत असून जितेंद्र आव्हाड यांना या दबावापोटीच अटक केली असल्याची टीका राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

चित्रपटांवर चर्चा व्हायला हवी- छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्यामुळे याबाबत इतिहासकारांना घेऊन चर्चा केली जावी. कोणत्याही राजकीय पक्षाला या चर्चेत घेऊ नये सर्व राजकीय पक्षांना चर्चेपासून लांब ठेवून इतिहासकारांकडून जो खरा इतिहास आहे तो समजून घेऊनच चित्रपटात तो दाखवला गेला पाहिजे असेही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.