ETV Bharat / state

Mumbai Suicide News: लिंग परिवर्तन केलेल्या तरुणीने राहत्या घरात केली आत्महत्या, हे होते कारण...

author img

By

Published : Mar 7, 2023, 7:11 AM IST

गोरेगाव येथे ३७ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली आहे. लिंग परिवर्तन करुनही मुलगी मानत नसल्याने नैराश्यातून तिने जीवन संपविले अशी चर्चा आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Suicide News
तरुणीने राहत्या घरात केली आत्महत्या

मुंबई: गोरेगाव येथे राहणार्‍या जोएना नावाच्या एका ३७ वर्षांच्या तरुणीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाने लिंग परिवर्तन करुन मुलगी बनली होती. तिला कोणीही मुलगी मानत नव्हते, तिच्यासोबत मुलगी असल्याप्रमाणे वागत नव्हते. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून तिने जीवन संपविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सुसाईट नोट सापडली: घटनास्थळाहून पोलिसांना एक सुसाईट नोट सापडली आहे. त्यात तिने तिची ही खंत व्यक्त केली आहे. दरम्यान तिच्या मित्राचा जबाब नोंदवून गोरेगाव पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. तिच्या आत्महत्येची माहिती तिच्या कोलकाता येथे राहणार्‍या कुटुंबियांना देण्यात आली आहे. ही घटना गोरेगाव येथील यशवंतनगर, रिद्धीसिद्धी हाईट्स अपार्टमेंटच्या चौदाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक बी/१४०२ मध्ये घडली आहे.

गळफास लावून आत्महत्या : जोएना ही मूळची कोलकाताची रहिवाशी असून २०१८ साली ती कोलकाता येथून मुंबईत नोकरीनिमित्त आली होती. तेव्हापासून ती तिच्या एका मित्रासोबत गोरेगाव येथील एका फ्लॅटमध्ये राहत होती. सकाळी तिचा मित्र एका सलूनमध्ये हेअर कटींगसाठी गेला होता. दरम्यान, साडेदहा वाजता तो फ्लॅटमध्ये आला असता त्याला जोएनाने घरातच आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर त्याने तिला तात्काळ गोरेगाव येथील एमजी रोडवर असलेल्या कपाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

काही वर्षांपूर्वी लिंग परिवर्तन: घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून गोरेगाव पोलीसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासात मृत महिलेचे नाव जोएना असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईट नोट सापडली आहे. त्यात तिने काही वर्षांपूर्वी लिंग परिवर्तन केल्याचे नमूद केले होते. लिंग परिवर्तन करुन ती मुलगी झाली होती. मात्र, तिला कोणीही मुलगी म्हणून स्विकारत नव्हते. तिच्यासोबत मुलगी असल्याप्रमाणे वागत नव्हते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातूनच तिला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिच्या मित्रांचा पोलीसांनी जबाब नोंदवून घेतला. त्याने तिच्या आत्महत्येबाबत कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तिच्या कुटुंबियांना या आत्महत्येची माहिती दिली आहे. जोएनाचा मृतदेहनंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.

हेही वाचा: Youth Suicide in Maharashtra तरूणांना झालंय तरी काय राज्यात दररोज जवळपास १३ जण संपवताहेत आयुष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.