ETV Bharat / state

Abu Azmi Received Death Threats : औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

author img

By

Published : Jan 21, 2023, 10:25 PM IST

Updated : Jan 21, 2023, 10:37 PM IST

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना फोनवरून औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना फोनवरून औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आयपीसीच्या कलम ५०६ (२) आणि ५०४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

  • Samajwadi Party's Maharashtra president Abu Asim Azmi received death threats for supporting Aurangzeb over phone call. FIR lodged at Colaba Police Station in Mumbai against the unknown person under sections 506 (2) and 504 of the IPC. Further investigation underway: Mumbai Police

    — ANI (@ANI) January 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Samajwadi Party's Maharashtra president Abu Asim Azmi received death threats for supporting Aurangzeb over phone call. FIR lodged at Colaba Police Station in Mumbai against the unknown person under sections 506 (2) and 504 of the IPC. Further investigation underway: Mumbai Police

— ANI (@ANI) January 21, 2023

औरंगजेब वाईट नव्हता - औरंगाबाद शहराच्या राजे संभाजी नगर नामांतरानंतर राज्यात वादंग निर्माण झाला होता. सपाचे आमदार अबू आझमी यांनीही मुक्ताफळे उधळली होती. औरंगजेब वाईट नव्हता, त्याचा चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात आहे. खरा इतिहास दाखवला तर हिंदूही नाराज होणार नाहीत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.

हिंदू नाराज होणार नाहीत - भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदूंवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला होता. यावर अबू आझमी यांनी देशात हिंदूंवर हल्ला होत आहे तसेच, मुस्लिम बांधवांवर देखील हल्ले होत आहेत. नितेश राणे यांनी धर्माच्या नावावर मंदिर-मस्जिद यावर भाडकवण्याचे काम करू नये, असे आझमी यांनी बजावले होते. औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. औरंगाबाद मध्येही औरंगजेब अशी नावे आहेत. 36 जिल्ह्यांतील तीन जिल्ह्याची नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद असल्याचे आझमी म्हणाले होते.

मुंबई - समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना फोनवरून औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आयपीसीच्या कलम ५०६ (२) आणि ५०४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

  • Samajwadi Party's Maharashtra president Abu Asim Azmi received death threats for supporting Aurangzeb over phone call. FIR lodged at Colaba Police Station in Mumbai against the unknown person under sections 506 (2) and 504 of the IPC. Further investigation underway: Mumbai Police

    — ANI (@ANI) January 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

औरंगजेब वाईट नव्हता - औरंगाबाद शहराच्या राजे संभाजी नगर नामांतरानंतर राज्यात वादंग निर्माण झाला होता. सपाचे आमदार अबू आझमी यांनीही मुक्ताफळे उधळली होती. औरंगजेब वाईट नव्हता, त्याचा चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात आहे. खरा इतिहास दाखवला तर हिंदूही नाराज होणार नाहीत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.

हिंदू नाराज होणार नाहीत - भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदूंवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला होता. यावर अबू आझमी यांनी देशात हिंदूंवर हल्ला होत आहे तसेच, मुस्लिम बांधवांवर देखील हल्ले होत आहेत. नितेश राणे यांनी धर्माच्या नावावर मंदिर-मस्जिद यावर भाडकवण्याचे काम करू नये, असे आझमी यांनी बजावले होते. औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. औरंगाबाद मध्येही औरंगजेब अशी नावे आहेत. 36 जिल्ह्यांतील तीन जिल्ह्याची नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद असल्याचे आझमी म्हणाले होते.

Last Updated : Jan 21, 2023, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.