ETV Bharat / state

हाथरसचे बलात्कारी नटीबाईचे भाईबंद आहेत का? शिवसेनेची कंगनावर अप्रत्यक्ष टीका

हाथरस बलात्कार प्रकरणावरून शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणारी कंगना आता यूपी पोलिसांच्या कृत्याबद्दल शांत का म्हणत ते बलात्कारी तिचे भाईबंद आहेत का असा सवाल केला आहे.

Shiv Sena's mouthpiece taunts Kangana
हाथरसचे बलात्कारी कंगनाचे भाईबंद आहेत का
author img

By

Published : Oct 5, 2020, 10:10 AM IST

मुंबई - हाथरस बलात्कार प्रकरणात यूपी सरकार आणि पोलिसांबद्दल देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची आणि महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांच्या सध्या हाथरस प्रकरणावर कोणत्याच प्रतिक्रिया दिसून येत नाहीत. ते सध्या शेपूट घालून बसलेत आहेत काय ? असा सवाल शिवसेनेने केला आहे. तसेच मुंबई पोलिसांना बाबर सेना म्हणणारी अभिनेत्री कंगना रणौत हाथरस प्रकरणावर कोणतेही वक्तव्य करताना दिसून येत नाही. त्यावरून हाथरसचे बलात्कारी त्या नटीबाईचे भाईबंद आहेत का, असे म्हणत कंगनावरही नाव न घेता निशाणा साधला आहे.

सुशांतच्या प्रकरणात अनेक राजकारण्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. तसेच सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? असा सवाल शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

हाथरसमध्ये एका तरुण मुलीला बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? अशी टीका केली आहे.

मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!, असा टोलाही शिवसेनेने कंगना रणौतसह सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या भाजपला लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.