ETV Bharat / state

Manipulation of Gold : कामा कारखान्यात सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी ४ जणांना अटक

author img

By

Published : Feb 17, 2023, 7:59 PM IST

कामा कारखान्यातील सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कामा कारखान्यातील व्यवस्थापक अभियंता यात मुख्य आरोपी असुन इतर तीन जणांचा यात समावेश आहे. आरोपींमध्ये अभियंता मेहुल ठाकूर, निकेश मिश्रा, अविनाश बहादूर, हरिप्रसाद तिवारी सुरक्षा यांचा समावेश आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : कामा कारखान्यातील सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी व्यवस्थापक, अभियंता सुरक्षा रक्षकासह ४ जणांना अटक ज्वेलरी फॅक्टरीत सोन्याची फसवणूक करणाऱ्या प्रोसेस मॅनेजर, सुरक्षा रक्षकासह ४ जणांना मुंबईच्या वनराई पोलिसांनी अटक केली आहे. कामा कारखान्यातून 2 किलो 700 ग्रॅम सोने, तसेच प्लॅटिनम, 250 ग्रॅम चांदीची बिस्किटे चोरानी चोरली होती. या चोरांनी सुमारे 1 कोटी 56 लाखांच्या सोन्यावर डल्ला मारला होता. व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुंबईतील विविध भागातून ४ आरोपींना अटक केली आहे.

अहवालात चुका : तपासादरम्यान, पोलिसांनी कामा कारखाण्यात कामगार, व्यवस्थापकांची चौकशी सुरू केली असता, कारखान्यात सुमारे 400 लोक काम करत असल्याचे आढळून आले. कारखान्यात जाण्यापूर्वी सर्व कामगार, व्यवस्थापकांनी गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. कारखान्यात, सोने स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारा टाकाऊ पदार्थ, सोन्याचा वास काढण्याच्या प्रक्रियेत, हे सर्व एकाच ठिकाणी ठेवले जाते. कारखान्याच्या उत्पादन विभागात कार्यरत असलेला हाच अभियंता, पार्सल व्यवस्थापक सोन्याच्या साफसफाईसाठी पाठवलेल्या अहवालात चुका करत असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.

सोन्याची समान वाटप : आरोपी सोन्याच्या अहवालामध्ये फेरफार करुन कमी सोने पाठवून अधिक अहवालांच्या नोंदी करायचे. जेणेकरून ऑडिटमध्ये सोन्याचा गैरव्यवहार आढळून येऊ नये. याचाच फायदा घेत सुरक्षा रक्षक सोन्याचे तुकडे आणून तिघांमध्ये वाटून घेत होते. पोलिसांनी याप्रकरणी अभियंत्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्याचे साथीदार सोन्याचे तुकडे चोरून बाथरूममधील सुरक्षा रक्षकाला देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नंतर कार्यालयातून बोहेर पडल्यानंतर ते सोन्याचे तुकडे सर्वांमध्ये वाटून घेत असे.

चार अरोपींचा समावेश : अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभियंता मेहुल ठाकूर कास्टिंग विभागात काम करतो. तर, दुसरा आरोपी निकेश मिश्रा सोने वितळण्याचे काम करत असे. तसेच तिसरा आरोपी अविनाश बहादूर लेखा विभागात कामाला होता तर, चौथा आरोपी हरिप्रसाद तिवारी सुरक्षा व्यावस्था पाहत होता.

हेही वाचा - Narhari Zirwal on Rahul Narwekar: नार्वेकरांची निवड माझ्या देखरेखीखाली योग्य, तर उपाध्यक्षपद अयोग्य कसे, झिरवळांचा सवाल; नार्वेकरांनीही दिले प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.