ETV Bharat / state

Poking From Car Sun Roof : कारच्या सनरूफमधून डोकावणे हा गुन्हा आहे का? वाचा सविस्तर

author img

By

Published : Nov 13, 2022, 10:51 PM IST

कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणे हा देखील नियमांचा भंग (Poking from car Sun roof is offence) आहे का, असा प्रश्न ट्विटरवर वायरल झालेला झालेल्या या एका व्हिडिओ वरून अनेकांना पडला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी असे बाहेर डोकावणे नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.

Poking From Car Sun Roof
कारच्या सनरूफमधून डोकावणे

मुंबई: अलिकडेच एका महिलेने चालत्या कारच्या सनरूफमधून आपले डोके बाहेर काढल्याचा व्हिडिओ ट्विटरवर वेगाने व्हायरल (Woman Poking from Car Sunroof Video Viral) झाला. अगदी ट्रॅफिक पोलिसांच्या हँडलला टॅग केले होते, त्यानंतर स्थानिक वांद्रे ट्रॅफिक पोलिसांना () कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणे हा देखील नियमांचा भंग (Poking from car Sun roof is offence) आहे का, असा प्रश्न ट्विटरवर वायरल झालेला झालेल्या या एका व्हिडिओ वरून अनेकांना पडला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी असे बाहेर डोकावणे नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. Latest news from Mumbai

वाहनातून बाहेर डोकावणे हा गुन्हाच - तथापि, अनेक नागरिक सनरूफच्या संदर्भात वाहतूक नियम आणि चालत्या कारच्या सनरूफमधून उभे राहणे कायदेशीर आहे की नाही याबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. वांद्रे-वरळी सी लिंक वाहतूक पोलीस निरीक्षक पी कांबळे म्हणाले, “मोटार वाहन (एमव्ही) कायद्यानुसार, (चालत्या) कारच्या सनरूफमधून डोके किंवा शरीर बाहेर टाकणे गुन्हा आणि उल्लंघन मानले जाते." याबाबत अनेकांना माहिती नाही. परंतु हा नियम केवळ सी लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनांनाच लागू नसून शहरातील रस्त्यावरील वाहनधारकांनाही लागू आहे, असे सांगून त्यांनी अधोरेखित केले आहे.

सनरूफ सूर्यप्रकाश येण्यासाठी, डोकावण्यासाठी नव्हे - ते पुढे म्हणाले, “सनरूफचा मूळ उपयोग कारमध्ये सूर्यप्रकाश येणे हा आहे, परंतु जेव्हा लोक त्यांचे डोके किंवा शरीर बाहेर ठेवतात तेव्हा ते इतरांच्या दृष्टीस (नज़रेस) अडथळा आणू शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही दुर्घटना वा अपघात घडू शकतात. मोटर वाहन कायद्याच्या कलम 184 (एफ) नुसार, सावधपणे वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरसाठी धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे धोकादायक हे स्पष्ट असेल तर ते दंडनीय असेल.

डोकावल्याने अपघाताला निमंत्रण - याआधी काचेचा लेप असलेला 'मांजा' किंवा पतंगाच्या धाग्याने चालत्या चारचाकी वाहनातून लोकांचा गळा चिरल्याच्या घटना घडल्या आहेत. कारच्या सर्व साधारण उपयोग हा सूर्यकिरणे कारमध्ये येण्यासाठी आहे. पण जेव्हा या सणरूफमधून बाहेर डोकावले जाते. तेव्हा पाठीमागील वाहनांची ब्लॉक होतो. असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोटर कायद्यानुसार कारमधून डोके अथवा शरीराचा कोणताही अवयव बाहेर काढणे हा गुन्हा मानला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.