ETV Bharat / state

एसटीचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय नाही- अनिल परब - एसटी कर्मचारी कपात न्यूज

एसटीचे कोणतेही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच सद्य स्थितीत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून लॉकडाऊननंतर एसटीच्या आवश्यकतेनुसार सेवा ज्येष्ठता बघून त्यांना एसटी समाविष्ट करून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

st wrokers
संग्रहित
author img

By

Published : Jul 22, 2020, 7:25 AM IST

मुंबई - कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच परिवहन मंत्रालयाने नुकताच एक अध्यादेश काढून 4 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या आदेशला स्थगित दिली आहे. त्या अध्यादेशानंतर एसटीतून कर्मचारी कमी करण्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यावर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटीचे कोणतेही कर्मचारी कमी करण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच सद्य स्थितीत भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून लॉकडाऊननंतर एसटीच्या आवश्यकतेनुसार सेवा ज्येष्ठता बघून त्यांना एसटी समाविष्ट करून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लॉकडाऊनमुळे एसटीची वाहतूक सेवा बंद आहे. परिणामी उत्पन्न नसल्याने एसटी कामगारांचे पगार होऊ शकले नाहीत. यावर आज लॉकडॉऊन संपल्यानंतर तयारी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तरीही एसटीच्या गरजेचे लागणारे पैसे आम्ही सरकारकडे मागत आहोत. गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या गाड्यांचा निर्णय अद्याप झाला नसला तरी आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत, असे परब यांनी म्हटले.

एसटीचे कर्मचारी कमी करण्याचा निर्णय नाही- अनिल परब

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला अमर अकबर अँथॉनीच सरकार असल्याची टीका केली, त्यावर परब यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अमर अकबर अँथॉनीच सरकार असलं तरी आम्ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरलो असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.