ETV Bharat / state

भाजपकडून प्रचारासाठी सैनिकांचा वापर नाही, सर्जिकलबाबत बोलण्याचा जनतेचाच आग्रह - सीतारामन

मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने काहीही ठोस भूमिका घेतली नाही.  दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले नाही. मोदी सरकारने सरकारने पुलवामा इथल्या शाहिद सैनिकांचा बदला घेत थेट पाकिस्तनात हल्ला केला. ही या सरकारची निर्णय क्षमता आहे.

भाजपकडून प्रचारासाठी सैनिकांचा वापर नाही, सर्जिकलबाबत बोलण्याचा जनतेचाच आग्रह - सीतारामन
author img

By

Published : Apr 26, 2019, 11:56 AM IST

मुंबई - भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सैन्याचा वापर होत नाही. मात्र, पाकिस्तानातील बालकोट इथल्या सर्जिकल स्टाईक बाबत बोलण्याचा आग्रह जनतेतूनच होत असल्याचे देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपच्या कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून विकास कामांच्या ऐवजी सैन्याच्या शौर्याचे भांडवल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, सीतारामन यांनी ही प्रतिक्रिया दिली.

देशातल्या अनेक भागात मोदी सरकारच्या ५ वर्षांच्या विकास कामांवर आम्ही प्रचार करत आहोत. मात्र, अनेकदा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर, सर्जिकल स्ट्राईकवर नेत्यांनी बोलावे अशा चिठ्या जनतेतूनच येत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने काहीही ठोस भूमिका घेतली नाही. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले नाही. मोदी सरकारने सरकारने पुलवामा इथल्या शाहिद सैनिकांचा बदला घेत थेट पाकिस्तनात हल्ला केला. ही या सरकारची निर्णय क्षमता आहे. काँग्रेसला निर्णयक्षमतेवर बोललेले रुचत नाही, असेही त्या म्हणाल्या. आम्ही गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांबाबत जनतेत प्रचार करतोय. पण आता जनताच राष्ट्रीय सुरक्षे बाबत अधिक जागरूक झाली असून त्यांना राजकीय पक्षांनी सुरक्षेबाबत आश्वस्त करावे, अशी अपेक्षा आहे. असेही सीतारामन यांनी सांगितले.

जेव्हा विरोधी पक्ष बालकोटच्या घटनेचे पुरावे मागतात तेव्हा मला दुःख होते. अटलजींच्या काळात ही युद्ध झाली पण त्यांनी कधीही अशी भाषा केली नाही. पाकिस्तानला रुचणारी विरोधकांची भाषा आहे, अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.

काश्मीर मधील सैन्य मागे घेणार नाही -

भारतीय सैन्याच्या संदर्भातील असफ हा कायदा बदलून काश्मीर मधून सैन्यबळ कमी करण्याची भाषा काँग्रेस करत आहे. पण ते आम्ही होऊ देणार नाही, असेही सीतारामन यांनी सांगितले. कॅग आणि सर्वोच्च न्यायालयाने राफेल बाबत निर्वाळा दिला आहे. काँग्रेस अजूनही बिनबुडाचे आरोप करत आहे. " चौकीदार चोर है" हे न्यायालयाने ही मान्य केले असल्याचे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांना खडसावले असून त्यांना याबाबत माफी मागावी लागली आहे. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. मोदी सरकारने दहशतवादाबाबत अतिशय कठोर भूमिका वारंवार मांडली आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत मोठा दहशतवादी हल्ला झाला, भारतही श्रीलंकेच्या पाठीशी असून या हल्ल्याचा आम्ही निषेध केला आहे, आवश्यक वाटल्यास श्रीलंकेला मदत ही देऊ असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

Intro:सूचना- या बातमी साठी सीतारामन यांचे फीड LIVE U वरून आधीच पाठवले आहे.

भाजपकडून प्रचारात सैनिकांचा वापर नाही, जनतेचाच राष्ट्रीय सुरक्षेचा आग्रह....निर्मला सीतारामन

मुंबई 25

भाजपकडून लोकसभेच्या प्रचारात सैन्याचा वापर होत नाही,मात्र जनतेकडूनच पाकिस्तानातील बालकोट इथल्या सर्जिकल स्टाईक बाबत बोलण्याचा आग्रह जनतेतून होत असल्याचे देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. मुंबई भाजपच्या कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकसभेच्या प्रचारात भाजपकडून विकास कामांच्या ऐवजी सैन्याच्या शौर्याचे भांडवल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता सीतारामन यांनी ही प्रतिक्रिया दिली.
देशातल्या अनेक भागात मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या विकास कामांवर आम्ही प्रचार करत आहोत. मात्र अनेकदा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर , सर्जिकल स्ट्राईक वर नेत्यांनी बोलावे अश्या चिठ्या जनतेतूनच येत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

मुंबईत झालेल्या 26/11च्या हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारने काहीही ठोस भूमिका घेतली नाही.तसेच दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले नाही. मोदी सरकारने सरकारने पुलवामा इथल्या शाहिद सैनिकांच्या बदला घेत थेट पाकिस्तनात हल्ला केला. ही या सरकारची निर्णय क्षमता आहे. काँग्रेसला निर्णयक्षमतेवर बोललेले रुचत नाही असेही त्या म्हणाल्या. आम्ही गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांबाबत जनतेत प्रचार करतोय,पण आता जनताच राष्ट्रीय सुरक्षे बाबत अधिक जागरूक झाली असून त्यांना राजकीय पक्षानी सुरक्षेबाबत आश्वस्त करावं अशी अपेक्षा आहे असेही सीतारामन यांनी सांगितले.
जेव्हा विरोधी पक्ष बालकोटच्या घटनेचे पुरावे मागतात तेव्हा मला दुःख होते, अटलजींच्या काळात ही युद्ध झाली पण त्यांनी कधीही अशी भाषा केली नाही. पाकिस्तानला रुचणारी विरोधकांची भाषा आहे, अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.

काश्मीर मधील सैन्य मागे घेणार नाही

भारतीय सैन्याच्या संदर्भातील असफ हा कायदा बदलून काश्मीर मधून सैन्यबळ कमी करण्याची भाषा काँग्रेस करत आहे, पण ते आम्ही होऊ देणार नाही, असेही सीतारामन यांनी सांगितले. कॅग आणि सर्वोच्च न्यायालयाने राफेल बाबत निर्वाळा दिला आहे. पण काँग्रेस अजूनही बिनबुडाचे आरोप करत आहे. " चौकीदार चोर है" हे न्यायालयाने ही मान्य केले असल्याचे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांना खडसावले असून त्यांना याबाबत माफी मागावी लागली आहे, त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा अवमान करू नये असेही त्यांनी म्हटले.
मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. मोदी सरकारने दहशतवादाबाबत अतिशय कठोर भूमिका वारंवार मांडली आहे. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत मोठा दहशतवादी हल्ला झाला , भारतही श्रीलंकेच्या पाठीशी असून या हल्ल्याचा आम्ही निषेध केला आहे, आवश्यक वाटल्यास श्रीलंकेला मदत ही देऊ असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. Body:.......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.