मुंबई : पश्चिम रेल्वेने ( Western Railway ) नवीन एसी लोकलची प्रथमच बांधणी केली आहे. ती नुकतीच सेवेत दाखल झाली आहे. पूर्वीच्या एसी लोकल पेक्षा यात अधिक आसनक्षमता आहे. लोकलची आसान क्षमता वाढण्याबाबत रेल्वे प्रवाशांची सातत्याने मागणी होती. विद्युत मोटार यंत्रणा खालील भागात असलेली अंडरस्लग एसी लोकल सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईत दाखल झाली होती. आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीची चाचणी झाली होती.
पश्चिम रेल्वेवर किंवा मध्य रेल्वेवर ज्या एसी लोकल धावतात. त्यामध्ये 1,028 प्रवासी बसू शकतात. मात्र या लोकलमध्ये 1,118 म्हणजेच आधीच्या एसी लोकल असे क्षमतेपेक्षा 90 प्रवासी अधिकचे बसू शकतात. या लोकलमध्ये विशेष सोय आहे ती म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या डब्यापासून ते थेट बाराव्या क्रमांकाच्या डब्यापर्यंत प्रवाशांना जाण्याची सोय आहे .आणि हे अंडरस्लग लोकल मुळे होते. सध्या धावत असलेल्या लोकलमध्ये सहा डब्यांचे दोन भाग आहेत यामुळे प्रवाशांना पहिल्या ते सातव्या डब्यापर्यंत सहज जाता येते. ही ट्रेन ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्यासाठी तयार केली आहे.