ETV Bharat / state

भाजपाला आले ओहोटीचे दिवस, जळगावात शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून चिमटा

author img

By

Published : Mar 18, 2021, 2:59 PM IST

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा 'टप्प्यात कार्यक्रम' करत राष्ट्रवादीचा महापौर केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपाचा उधळलेला वारु आता ओहोटीच्या रुपात दिसू लागला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.

ncp-sopke-person-mahesh-tapase-reaction-on-jalgaon-corporation-election
महेश तपासे

मुंबई - सांगलीत 'टप्प्यात आल्यावर' राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रम केला, आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावत महापिलेकवर महापौर निवडून आणल्याने भाजपाला ओहोटी लावल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपाचा 'टप्प्यात कार्यक्रम' करत राष्ट्रवादीचा महापौर केला आणि आता जळगावात शिवसेनेने भाजपाची सत्ता उलथवून लावली आहे. जळगावात आज शिवसेनेने भगवा फडकवला असून भाजपाचा उधळलेला वारु आता ओहोटीच्या रुपात दिसू लागला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे, असेही महेश तपासे म्हणाले. तसेच भाजप महाविकास आघाडी वर कितीही आरोप लावत असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनता ही महाविकास आघाडीच्या मागेच उभी आहे हे सत्य भाजप नाकारू शकत नाही. म्हणूनच जळगाव च्या महापौरपदी शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले आहेत, असे मत महेश तपासे यांनी व्यक्त केले. जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार निवडून यावा, यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ताकदीला जळगावात छेद गेला होता. त्यामुळे शिवसेनेने त्याचा उपयोग करत आपला महापौर जळगाव महानगरपालिकेच्या पदी विराजमान केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची प्रतिक्रिया..

हेही वाचा - 'आयडॉल'चा सुवर्णमहोत्सवी पदवीदान समारंभ; उदय सामंत यांची उपस्थिती

जळगावात राष्ट्रवादी सत्तेत -

आज जळगाव महापालिकेच्या महपौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये शिवसेनेला 45 मते मिळाली. भाजपच्या 27 नगरसेवकांना गळाला लावून शिवसेनेने गिरीश महाजन यांच्या अस्तित्वाला सुरूंग लावला आहे. जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांच्याकडे महापौर पदाची धुरा आली आहे. जळगाव महापालिकेत माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाजपचे वर्चस्व होते. गेल्या अडीच वर्षापासून पालिकेत भाजपाचाच महापौर होता. परंतु आता भाजप नगरसेवकांच्या एका गटाने बंडखोरी करत पक्षाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या 57 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक हे शिवसेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सांगली पॅटर्न राबवल्याचे चित्र दिसून आले आहे.

हेही वाचा - जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता; सांगली पॅटर्नचा भाजपला धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.