ETV Bharat / state

Mumbai Crime: लज्जास्पद! अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकास अटक

author img

By

Published : Nov 29, 2022, 10:32 AM IST

Updated : Nov 29, 2022, 10:52 AM IST

Mumbai Crime: अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकास अटक करण्यात आले आहे. पिडित महिलेने एक खाजगी टॅक्सी बुक केली होती. मुंबईतील अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली

abuse
abuse

मुंबई: मुंबईतील अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकास अटक करण्यात आले आहे. पिडित महिलेने एक खाजगी टॅक्सी बुक केली होती. मुंबईतील अंधेरी परिसरात अमेरिकन महिलेसमोर हस्तमैथुन करणाऱ्या टॅक्सी चालकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. योगेंद्र उपाध्याय असे अटक करण्यात आलेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असल्याचं समजतं आहे.

टॅक्सी चालकाने महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात: मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या अमेरिकन महिलेला मुंबईतील टॅक्सी चालकाच्या कृतीचा विचित्र अनुभव आला. अमेरिकन महिलेने एक खाजगी टॅक्सी बुक केली होती. प्रवास करताना टॅक्सी अंधेरी परिसरात पोहोचताच, टॅक्सी चालकाने महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. कॅब (टॅक्सी)चालकाच्या या कृतीमुळे ती महिला चांगलीच गोंधळून गेली होती. महिलेला सुरुवातीला हा प्रकार काही समजला नाही.

टॅक्सी चालकास अटक: मात्र महिलेने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. लोक जमा झाले आणि त्याच काळात टॅक्सी चालक योगेंद्र उपाध्याय हा पळून गेला आहे. मात्र, अंधेरी पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आतच टॅक्सी चालक योगेंद्र उपाध्याय याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टॅक्सी चालका विरोधात भादवी कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयात उभे केले आहे. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Last Updated : Nov 29, 2022, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.