मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात खरी लढत होत आहे. मतमोजणी केंद्रावर भाजपचा पिवळा ड्रेस कोड आकर्षणचा विषय ठरत आहे. भाजपकडून आपलाच विजय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
येथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना पिवळा ड्रेस कोड देण्यात आला असून, हा ड्रेस कोड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासंदर्भात काही कार्यकर्त्यांशी विचारणा केली असता, त्यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून मतमोजणीसाठी आलेल्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पिवळ्या रंगाचा झब्बा आणि त्याखाली सफेद रंगाची पॅन्ट देण्यात आली आहे. या रंगामुळे भाजपचे प्रतिनिधी कोण आहेत याची ओळख मतमोजणी केंद्रात आणि त्याबाहेर होईल यासाठी आम्हाला असे ड्रेस कोड देण्यात आल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
90 हून अधिक कार्यकर्ते आणि त्यासोबतच मतमोजणी केंद्रावर असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हा ड्रेस कोड देण्यात आला आहे. त्यामुळे आमची एक वेगळी ओळख या मतमोजणी केंद्रात असल्याचे सांगण्यात आले आहे.