ETV Bharat / state

'रामाची तुलना बाबर बरोबर करणं हे चुकीचं'

author img

By

Published : Feb 20, 2020, 2:32 PM IST

शरद पवार यांनी राम मंदिराची तुलना बाबरी मस्जिद बरोबर केली याचा खेद आहे. अध्यायेत राम मंदिराचे निर्माण व्हावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तसेच देशातील 121 कोटी लोकांचीही हीच भावना आहे. या भावनेचा मोदी सरकार आदर करते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना जर मुस्लिम समाजासाठी काही करायचे असेल तर त्यांनी ते खुशाल करावे, सोमय्या म्हणाले आहेत.

bjp leader kirit somayya
bjp leader kirit somayya

मुंबई - केंद्र सरकार राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकते तर मशिद बनवण्यासाठी का नाही बनवू शकत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केला होता. देश सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांसाठी आहे, असे पवार तुलना करत म्हणाले. यावर पवारांनी मुस्लिम समाजासाठी करता येईल ते करावे. मात्र, त्याची तुलना करू नका, असा टोला भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

किरीट सोमय्या (ज्येष्ठ नेते, भाजप)

शरद पवार यांनी राम मंदिराची तुलना बाबरी मस्जिद बरोबर केली याचा खेद आहे. अध्यायेत राम मंदिराचे निर्माण व्हावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तसेच देशातील 121 कोटी लोकांचीही हीच भावना आहे. या भावनेचा मोदी सरकार आदर करते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना जर मुस्लिम समाजासाठी काही करायचे असेल तर त्यांनी ते खुशाल करावे, असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा - 'राम मंदिरासाठी ट्रस्ट, तर मग मशिदीसाठी का नाही?'

मुंबईत हाजी अली दर्ग्यासाठी राज्य सरकारने 35 कोटी रुपये दिले. हजसाठी केंद्र सरकार अनुदान देते. मात्र, रामाची तुलना बाबर बरोबर करणे हे आम्हाला मान्य नाही. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टद्वारे आर्थिक मदत देण्यात येत आहे. मात्र, बाबरी मशीद पाडली, त्यासाठी सरकार काही मदत करत नाही, राम मंदिर प्रमाणे बाबरी मशिदीसाठीही ट्रस्ट तयार करावे आणि मदत करायली हवी, असे वक्तव्य पवार यांनी केले होते. सोमय्या यांनी ट्विटरवर आपला व्हिडिओ पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.