ETV Bharat / state

मनसेची राज्यव्यापी बैठक सुरू; विविध मुद्द्यांवर होणार चर्चा

author img

By

Published : Jan 29, 2021, 12:41 PM IST

मुंबईमध्ये आज मनसेची राज्यव्यापी बैठक होत आहे. या बैठकीला अमित आणि मिताली हे दाम्पत्यही उपस्थित आहे. आज मिताली अधिकृतपणे मनसेच्या सदस्य होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

मुंबई - वांद्रे येथील क्रिकेट क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज्यव्यापी बैठक सुरू आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेने ही बैठक बोलावली असून त्यात इतरही विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मनसेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

मनसेची राज्यव्यापी बैठक सुरू

मिताली ठाकरेही उपस्थित -

आजच्या या बैठकीला राज ठाकरे यांच्या सुनबाई आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली या देखील उपस्थित आहेत. आज मिताली अधिकृतपणे मनसेच्या सदस्य होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यांवर चर्चा होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे यांच्यासह पक्षातील विविध नेते उपस्थित आहेत.

वीजबिलाच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता -

लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलाबाबत सवलत न देता यू-टर्न घेणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार उल्हासनगर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस उपायुक्त धुळा टेळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.