मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता बंद मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मार्चपर्यंत बंद पाळण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबई कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालल्याने परप्रांतिय आपापल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी करत आहेत. ही गर्दी पाहता शासनाने थर्मोग्राफी कॅमेरे रेल्वे स्थानकात बसवावा, अशी मागणी रेल्वे प्रशासन व राज्य सरकारला केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे थांबवणे गरजेचे आहे. पण, राज्य सरकारला ते शक्य नसेल तर गर्दीमधील पीडित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकात थर्मल कॅमेरे बसवावे. यामुळे गर्दीतील रूग्ण ओळखण्यास मदत होईल, असे मनसे नेते अखिल चित्रे यांनी सांगितले.
हेही वाचा - #LOCK'डाऊन : घाटकोपरमधील महात्मा गांधी रोडवर सक्तीच्या बंदीने शुकशुकाट