ETV Bharat / state

'केंद्र सरकारच्या नियोजन शून्यतेमुळेच देशभरात करोना पसरतोय'

author img

By

Published : May 3, 2021, 7:51 PM IST

केंद्रातील भाजप सरकारचे केवळ निवडणुकीवर लक्ष होते, त्यामुळेच देशभरामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार

मुंबई - महाराष्ट्रात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. या परिस्थितीसाठी सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार असल्याची टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. केंद्र सरकारचे लसीकरणाबाबत नियोजन शून्य होते. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणाचे नियोजन बिघडले असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच नियोजन करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार

राज्याला कोरोनामुक्त करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न

प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट तयार करण्यासंदर्भातचे निर्देश दिले गेले असून, त्यासाठी टेंडर मागवण्याचे काम सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हवेतून ऑक्सिजन तयार करणारे प्लांट प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात असले पाहिजेत. तसेच ऑक्सीजन साठवून ठेवण्याच्या क्षमतेचे टँकची देखील व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यासंदर्भातचे निर्देश दिले असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लस आयात करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या सोबतच राज्यात लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून राज्याला करोना मुक्त करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

निवडणुकीच्या नादात केवळ केंद्र सरकारने देशभरात पसरू दिला कोरोना

केंद्रातील भाजप सरकारचे केवळ निवडणुकीवर लक्ष होते, त्यामुळेच देशभरामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या परिस्थितीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही जबाबदार धरले असून, लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र, या सूचना तरी केंद्र सरकार अंमलात आणतील का, असा प्रश्नचिन्ह विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तसेच देशांमध्ये निर्माण झालेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातून आपल्यावर टीका होत असताना केंद्र सरकारला मात्र त्याचे सोयरसुतक नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. निवडणुकीच्या नादात केवळ केंद्र सरकारने देशभरामध्ये कोरोना पसरू दिला. पश्चिम बंगालच्या निवडणुका आठ टप्प्यांमध्ये घेण्यापेक्षा दोन टप्प्यात घेतल्या असत्या तर, देशातील बिघडलेली परिस्थिती काहीशी आटोक्यात असती, असे मत देखील विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - टाळेबंदीमुळे पुरोहितांच्या कुटुंबाची बिघडली आर्थिक घडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.