ETV Bharat / state

वर्षा निवासस्थानी शरद पवार अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू

author img

By

Published : Sep 19, 2020, 6:36 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात वर्षा येथे बैठक सुरू आहे.

शरद पवार
शरद पवार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे.

राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक असल्याचे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या अंतरिम निकालामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. मराठा समाजाकडून सरकार विरोधात वातावरण तयार केले जात आहे. तर विविध प्रवेश प्रक्रियेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.याचा मराठा आरक्षणाच्या प्रवेशाचा फटका बसला आहे. यामुळे या बैठकीत राज्य सरकारकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील किंवा त्यासाठी अध्यादेश काढता येईल का, यावर महत्त्वाची चर्चा होत असल्याचे सांगण्यात येते.

मागील काही दिवसात मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती पुन्हा बिघडत चालली असल्याने याबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यातील विविध सनदी अधिकारी तसेच तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून महाविकासआघाडीमध्ये बरीच नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात सरकार म्हणून कोणती भूमिका घेतली जावी याविषयीचे काही मार्गदर्शन पवार हे करणार असल्याचे सांगण्यात येते. त्यासोबत राज्यातील विविध महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या असून त्यावर तिन्ही पक्षाकडून फॉर्म्युला तयार असतानाही त्या विषयीचा निर्णय मार्गी लागत नाही यामुळे या बैठकीत चर्चा केली जाईल असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - 'कंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दवाब होता का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.