मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे नवी मुंबईतील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांनी समाजमाध्यमांद्वारेही जोरदार प्रचार सुरू केला आहे. ऐरोली मतदार संघातून महाआघाडीच्या माध्यमातुन अशोक शिंदे, महायुतीच्या माध्यमातून गणेश नाईक रिंगणात उभे आहे.
हेही वाचा - मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत
महायुती आणि महाआघाडीचे एकीकडे आव्हान असताना मनसेचे ऐरोली मतदारसंघातील उमेदवार निलेश बाणखेलेही आपला जोरदार प्रचार करत असून गृहभेटी आणि रॅली यांच्यावर ते प्रचारात भर देत आहे. सद्यस्थितीत जी परिस्थिती मतदार युती आणि आघाडीवर नाराज असल्याने आपण नक्कीच ऐरोली मतदार संघातुन विजयी होऊ, असा विश्वास मनसेचे उमेदवार निलेश बाणखेले यांनी व्यक्त केला आहे.