ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभार, बुधवारी महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनचे ठिय्या आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात 'महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला)' च्यावतीने बुधवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवन समोर सकाळी १२:३० वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या गलथान काराभाराविरोधात आंदोलन
author img

By

Published : Mar 12, 2019, 7:42 PM IST

मुंबई - 'महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला)' च्यावतीने बुधवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवन समोर सकाळी १२:३० वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात आणि विधी विभागाच्या निकाल दिरंगाई विरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती विद्यार्थी संघटनेचे सिद्धार्थ इंगळे यांनी दिली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ (Maharashtra Public Universities Act, २०१६), प्रकरण ८ कलम ८९ च्या अनुसार, विद्यापीठ प्रत्येक परीक्षेचे निकाल त्या विशिष्ट पाठ्यक्रमाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत किंवा उशिरात उशिरा म्हणजे ४५ दिवसांच्या आत घोषित करणे अनिवार्य आहे. परंतु, असे न होता ६० दिवस उलटून देखील परिक्षांचे निकाल जाहीर न करताच विद्यापीठ प्रशासनाने पुढच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करून टाकल्या आहेत.

गेल्या ४ वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थी विशेषतः विधी विभागाचा विद्यार्थी भरडला जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६, बार कौन्सिल ऑफ इंडिया, लीगल एज्युकेशन रुल २००८ या सगळ्या कायद्यांची पायमल्ली मुंबई विद्यापीठ करत आले आहे. विधी शिक्षणाचे स्टँडर्ड दिवसेंदिवस घसरत चालले आहे.

वेळेत निकाल घोषित करण्यासाठी ३ वर्षापासून मुंबई विद्यापीठाने ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टिम (OSM) ही नवीन मूल्यांकन पद्धत सुरु केली. परंतु, अनेक तांत्रिक चुका आणि त्रुटी यामुळे ही प्रणाली वेळेवर निकाल घोषित करण्यात अयशस्वी ठरली. उलट १०० दिवस उलटूनही निकाल लागत नाहीत. ही वस्तुस्थिती होती. गेल्या वर्षी नवनिर्वाचित कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी एक मोठा चुकीचा निर्णय घेतला. त्यात एलएलबी ३ वर्षांच्या सेमिस्टर १ ते ४ तसेच एलएलबी ५ वर्षांच्या सेमिस्टर ५ ते ८ मूल्यांकन करण्याची जबाबदारी पूर्णतः स्वतंत्रपणे महाविद्यालयांना सोपवण्यात आली खरी. परंतु महाविद्यालय ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेले आहेत. यावरून स्पष्ट होते, की मुंबई विद्यापीठ कायदाच्या(विधी) कोर्सला समजण्यात कमी पडत आहे.

भांडवलदारंच्या हाताचे बाहुले बनून विद्यार्थ्यांना देशोधडीला लावणारे मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारे राज्य सरकार यांचा जाहीर निषेध करण्यासाठी व खालील मागण्या मान्य करून घेण्यासाठी उद्या ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या गलथान काराभाराविरोधात आंदोलन

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या -

१. विधी विभागाच्या एलएलबी (LLB) सेमिस्टर ५ व ६ तसेच एलएलएम (LLM) सेमिस्टर ३ चे निकाल तत्काळ जाहीर करावे.

२. मुख्य निकाल जाहीर केल्यानंतर १० दिवसाच्या आत पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर करावे.

३. १७ मे २०१८ ला विधी विभागाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी, पूर्णतः स्वतंत्रपणे महाविद्यालयांना सोपवण्यात आलेले परिपत्रक तत्काळ रद्द करावे व सर्वच सेमिस्टरच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे ऑफलाईन करून विद्यापीठ स्तरावर करण्यात यावे.

४. विधी विभागाच्या एलएलबी (LLB) सेमिस्टर ३ चा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्टच्या प्रश्नपत्रिकेत २५ मार्कांची चूक आढळून आली होती. त्यावर विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची भरपाई न देता निकाल जाहीर करण्यात आला तरी त्या संदर्भात विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा.

५. विधी विभागाच्या एलएलबी (LLB) सेमिस्टर ४ पास झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ बॅचलर ऑफ जनरल डिग्री (BGL) प्रमाणपत्र प्रदान करण्यात यावे.

६. LLM च्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात.

७. कंपनी सेक्रेटरी (CS )अभ्यासक्रमाच्या परीक्षांमुळे विधी अभ्यासक्रमाच्या होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकलू नयेत.

Intro:महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारा विरोधात उद्या करणार ठिय्या आंदोलन

मुंबई

"महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला)” वतीने उद्या मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराच्या विरोधात आणि विधी विभागाच्या निकाल दिरंगाई विरोधात तीव्र ठिय्या आंदोलन कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवन समोर सकाळी १२:३० वाजता करणार आहेत याची माहीती विद्यार्थी संघटनेचे सिदार्थ इंगळे यांनी दिली.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ (Maharashtra Public Universities Act, 2016), प्रकरण आठ कलम ८९ च्या अनुसार विद्यापीठ प्रत्येक परीक्षेचे निकाल त्या विशिष्ट पाठ्यक्रमाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून तीस(३०) दिवसांच्या आत जाहीर करण्याचा आटोकाट प्रयन्त करील आणि तो कोणत्याही परिस्थितीत त्या अखेरच्या दिनांकांपासून उशिरात उशिरा म्हणजे ४५ दिवसांच्या आत घोषित करणे अनिवार्य आहे परंतु असे न होता ६० दिवस उलटून देखील परिक्षांचे निकाल जाहीर न करताच विद्यापीठ प्रशासनाने पुढच्या परिक्षांच्या तारखा जाहीर करून टाकल्या आहेत.

गेल्या चार वर्षा पासून मुंबई विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थी विशेषतः विधी विभागाचा विद्यार्थी भरडला जात आहे, विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६, बार कौन्सिल ऑफ इंडिया, लीगल एडुकेशन रुल २००८ या सगळ्या कायद्यांची पायमल्ली मुंबई विद्यापीठ करत आले आहे, विधी शिक्षणाचे स्टँडर्ड दिवसेंदिवस घसरत चाललेल आहे.

वेळेत निकाल घोषित करण्यासाठी, ३ वर्षा पासून मुंबई विद्यापीठाने ऑनस्क्रीन मार्किंग सिस्टिम (OSM) ही नवीन मूल्यांकन पद्धत सुरु केली परंतु अनेक तांत्रिक चुका आणि त्रुटी यामुळे ही प्रणाली वेळेवर निकाल घोषित करण्यात अयशस्वी ठरली उलट १०० दिवस उलटून ही निकाल लागत नाहीत ही वस्तुस्थिती होती गेल्या वर्षी नवनिर्वाचित कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी एक मोठा चुकीचा निर्णय घेतला त्यात एलएलबी 3 वर्षांच्या सेमिस्टर १ ते ४ तसेच एलएलबी ५ वर्षांच्या सेमिस्टर ५ ते ८ मूल्यांकन करण्याची जबाबदारी पूर्णतः स्वतंत्रपणे महाविद्यालयांना सोपवण्यात आली खरी परंतु महाविद्यालय ही जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेले आहेत.यावरून स्पष्ट होते की मुंबई विद्यापीठ कायदाच्या(विधी) कोर्सेला समजण्यात कमी पडत आहे.

भांडवलदारंच्या हाताचे बाहुले बनून विद्यार्थ्यांना देशोधडीला लावणारे मुंबई विद्यापीठ प्रशासन आणि त्यांना पाठीशी घालणारे राज्य शासन यांचा जाहीर निषेध करण्यासाठी व खालील मागण्या मान्य करून घेण्यासाठी उद्या ठिय्या आंदोलन करीत आहेत.

आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांचा मुख्य मागण्या-

1. विधी विभागाच्या एल एल बी (LLB) सेमिस्टर ५ व ६ तसेच एल एल एम (LLM) सेमिस्टर ३ चे निकाल तात्काळ जाहीर करावे

2. मुख्य निकाल जाहीर केल्यानंतर १० दिवसाच्या आत पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर करावे.

3. १७ मे २०१८ ला विधी विभागाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी पूर्णतः स्वतंत्रपणे महाविद्यालयांना सोपवण्यात आलेले परिपत्रक तात्काळ रद्द करावे व सर्वच सेमिस्टरच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे ऑफलाईन करून विद्यापीठ स्थरावर करण्यात यावे.

4. विधी विभागाच्या एल एल बी (LLB) सेमिस्टर ३ चा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट च्या प्रश्न पत्रिकेत २५ मार्कांची चूक आढळून आली होती त्यावर विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची भरपाई न देता निकाल जाहीर करण्यात आला तरी त्या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा.

5. विधी विभागाच्या एल एल बी (LLB) सेमिस्टर ४ पास झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ बॅचलर ऑफ जनरल डिग्री (BGL) प्रमाणपत्रक प्रदान करण्यात यावे.

6. LLM च्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात

7. कंपनी सेक्रेटरी (CS )अभ्यासक्रमाच्या परीक्षांमुळे विधी अभ्यासक्रमाच्या होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकलू नयेत.या सर्व मागण्यांसाठी त्यांचे हे आंदोलन उद्या होणार आहे.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.