मुंबई : नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाल बावटा मोर्चा मुंबईत पोहचणार आहे. या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळ सोबत चर्चा करण्यासाठी सरकारच्या वतीने मंत्री दादा भुसे, मंत्री अतुल सावे रवाना झाले आहेत. या बाबत बातमी पाठवली आहे त्या बातमीत मंत्री दादा भुसे यांचा बाईट समाविष्ट करावा. नाशिकहून विधिमंडळाकडे येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा आता ठाणे शहराच्या वेशीवर आला आहे. शेतकऱ्यांचे 'लाल वादळ' मुंबईजवळ येत असताना आता शिंदे-फडणवीस सरकारच्या दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चर्चा केली आहे. मंत्री दादा भुसे, आमदार अतुल सावे या दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद शाधला आहे. या दोन्ही मंत्र्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत चर्चा केली आहे.
-
Maharashtra farmers march | State ministers Dada Bhuse and Atul Save met the farmers' delegation. https://t.co/GJb03E4uun pic.twitter.com/7HtbQi16YQ
— ANI (@ANI) March 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra farmers march | State ministers Dada Bhuse and Atul Save met the farmers' delegation. https://t.co/GJb03E4uun pic.twitter.com/7HtbQi16YQ
— ANI (@ANI) March 15, 2023Maharashtra farmers march | State ministers Dada Bhuse and Atul Save met the farmers' delegation. https://t.co/GJb03E4uun pic.twitter.com/7HtbQi16YQ
— ANI (@ANI) March 15, 2023
माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च पुन्हा मुंबईत येत आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हे शेतकरी तब्बल १८० किलोमीटरचा पायी प्रवास करत मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली दिरंगाई, गारपीटग्रस्तांना मदत देण्याकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे किसान सभेच्या नेत्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Cm On Employees Strike : मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन