मुंबई - राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि साधनसामुग्रीवर याचा परिणाम होताना दिसत आहे. नालासोपाऱ्यामध्ये सोमवारी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेने एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यास ठाकरे सरकार जबाबदार असून हे मृत्यू नसून हत्या आहे, असा आरोप करत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.
किरीट सोमैया म्हणाले, मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा येथील विनायक रुग्णालयात सोमवारी (दि.12 एप्रिल) एकाच दिवशी 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, हे मृत्यू रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणेतील त्रुटीमुळे झाले आहेत. त्यामुळे हे मृत्यू नसून ठाकरे सरकारने केलेली हत्या आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा - म्हणून... महाराष्ट्रात कोरोना रुग्णात वाढ; संजय राऊतांनी सांगितलं कारण
हेही वाचा - 'गेल्या 70 वर्षांत एवढा बेजबाबदार पंतप्रधान देशानं पाहिला नाही'