मुंबई- 21 जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने जगाला योग दिला. योगासने केल्याने आरोग्य उत्तम राहते. मानसिक ताणतणावामुळे होणारे रोग योगासने केल्यामुळे होत नाहीत. योगासनामध्ये प्राणायाम हा उत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. प्राणायामामुळे आपल्या फुफ्फुसांची क्रियाशक्ती वाढते. कोरोनाच्या काळात योगासनांचा फायदा होतोय. प्राणायाम हा सारखा श्वसनाचा व्यायाम केल्यानंतर फुफ्फुसं उत्तम होतात. कोरोना विरोधात लढण्यासाठी प्राणायम एक उत्तम योगासन असल्याचे योग प्रशिक्षक राखी शेळके यांनी सांगितले.
कोरोना विरोधात लढण्यासाठी प्राणायाम एक उत्तम योगासन