ETV Bharat / state

Jitendra Awhad : 'सद्गुरूंनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा..', जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Sadguru Jitendra Awhad

जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Sadguru Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड सद्गुरू
author img

By

Published : May 6, 2023, 10:46 PM IST

मुंबई : जग्गी वासुदेव (सद्गुरू) यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओवरून सध्या वाद सुरु झाला आहे. 'सद्गुरु यांनी ॲनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती प्रसारित केली आहे. त्यांनी नको त्या विषयात हात घालून एक वाद निर्माण केला आहे. तो वाद ताबडतोब मिटवायला हवा. माझी सद्गुरूंना विनंती आहे की आपण शब्द मागे घेवून महाराष्ट्राची माफी मागावी', अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

जितेंद्र आव्हाडांचे ट्विट : जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये सद्गुरु यांनी व्हिडिओमध्ये कोणते शब्द वापरले याची माहिती दिली आहे. रामदास हे शिवाजींचे गुरु होते. रामदासांना भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले. रामदासांच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेऊन भिक्षा मागू लागले. पुढे रामदासांनी स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देऊन त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले, अशा प्रकारचे ॲनिमेशन व्हिडिओ सद्गुरु यांनी प्रसारित केले आहे. हे कुठल्याच इतिहासाच्या जवळपास नाही. आम्ही हे त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे त्यांनी त्या ॲनिमेशन व्हिडिओ मधील वाक्य मागे घ्यावे. उगाच कारण नसताना वाद निर्माण व्हायला नको. आपले शब्द मागे घ्या, असे ट्वीट आव्हाडांनी केले आहे.

  • जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा…

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'कायदेशीर कारवाई करा' : पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी, महाराष्ट्र असा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जातो आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar Resignation : '..म्हणून मी राजीनामा मागे घेतला', अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण
  2. Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांच्या नियतीविषयी शरद पवार स्षष्टच बोलले; म्हणाले, अजित पवार हे तर....
  3. Uday Samant: स्थानिक विरोधासाठी नव्हे तर, ठाकरेंना भेटायला आले; जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल उद्योग मंत्र्यांनी वाचला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.