मुंबई - रविवारपासून आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंट पर्वाला सुरवात झाली. प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी प्लेसमेंट प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांना कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचे पॅकेज देऊ केले आहे. यात पहिल्या दिवशी मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून 1.17 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. तर उबेर कंपनीने देखील 1.02 कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याची माहिती आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेल कडून जाहीर करण्यात आले आहे.
संशोधन आणि नवीन अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई आयआयटीमध्ये यावर्षीही विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 1 कोटी रुपयांचे घसघशीत पॅकेज देण्यात आले. पहिल्या दिवशी आयआयटी कॅम्पस मध्ये 18 कंपन्यानी सहभाग घेतला होता. पहिल्या दिवशीचा दुसरा टप्पा रात्री उशिरापर्यंत चालू होता. यात अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांनी आयटीच्या विद्यार्थ्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे.
हेही वाचा - जिओकडून रिचार्जच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ
यंदा मंदीमुळे प्लेसमेंट कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, यंदा अपेक्षेपेक्षा चांगली नोंदणी झाल्याचे आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर मागील वर्षी 21 कंपन्यांची नोंदणी झाली होती. यंदा ही संख्या 18 इतकी झाली आहे. पहिल्या दिवशी 110 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर 1700 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'सरकारला अर्थव्यवस्थेवरील टीका ऐकायची नाही'
यावर्षी डॉलरची किमंत कमी वाढल्याने परदेशी कंपन्यांनी देऊ केलेल्या पॅकेजचे मूल्य वाढले आहे. तर देशातील अपॉइंटमेंटला दिलेले पॅकेज हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. मायक्रोसॉफ्ट, कॉलकॉम, उबर अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी पहिल्या दिवशी प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला. इंजिनिअरिंग, आयटी, सॉफ्टवेअर, फायनान्स ऍण्ड कन्सल्टिंग आदी क्षेत्रांतील कंपन्या पुढील फेर्यांमध्ये सहभागी होण्याची आयआयटीला आशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही चांगल्या ऑफर प्राप्त होणार आहेत.