ETV Bharat / state

High Court permits sale of liquor : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीला उच्च न्यायालयाची परवानगी..

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या ( Andheri East Assembly by election ) मतमोजणीच्या दिवशी प्रभागातील मद्यविक्रेत्यांना मद्यविक्री कऱण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मतमोजणी प्रक्रियेचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून निर्णय जाहीर झाल्यानंतर अथवा संध्याकाळी 6 नंतर येथील हॉटेल्स आणि मद्यविक्री करणाऱ्यांना मद्यविक्री करण्याची परवानगी असल्याचे न्यायालयाने ( High Court permits sale of liquor )स्पष्ट केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 2, 2022, 10:37 PM IST

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या ( Andheri East Assembly by election ) मतमोजणीच्या दिवशी प्रभागातील मद्यविक्रेत्यांना मद्यविक्री कऱण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मतमोजणी प्रक्रियेचा निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून निर्णय जाहीर झाल्यानंतर अथवा संध्याकाळी 6 नंतर येथील हॉटेल्स आणि मद्यविक्री करणाऱ्यांना मद्यविक्री करण्याची परवानगी असल्याचे न्यायालयाने ( High Court permits sale of liquor )स्पष्ट केले आहे.

न्यायलयात केली होती याचिका - न्या. एन. आर. बोरकर आणि न्या. कमल खाता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन तसेच असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर विक्रेत्यांनी याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने 18 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा असोसिएशनकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. अधिसूचनेनुसार 1 ते 3 नोव्हेंबर आणि मतमोजणीच्या 6 नोव्हेंबर दिवशी मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली होती. मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्रीवर बंदीची गरज नाही असा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. तर ड्राय-डेची अधिसूचना उत्पादन शुल्क विभागाने भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमांवर आणि लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींच्या आधारे जारी केली असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद मोरे यांनी न्यायालयाला दिली आहे.

दारू विक्रीला परवानगी - याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 नंतर किंवा मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर दारू विक्रीस परवानगी दिली जाऊ शकते का? अशी विचारणा राज्य सरकारकडे केली होती. त्यावर बुधवारी उत्पादन शुल्क विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्याने 6 नोव्हेबर रोजी संध्याकाळी मद्यविक्रीला परवानगी दिली जाऊ शकते अशी माहिती खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने मतमोजणीच्या दिवशी प्रभागातील मद्यविक्रेत्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर अथवा संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.