ETV Bharat / state

पालिका रुग्णालयात युरिन बॅग घोटाळा; दोषींवर कारवाईची मागणी

author img

By

Published : Dec 12, 2019, 12:53 PM IST

महापालिका रुग्णालयात ज्या युरिन बॅग वापरायला हव्यात त्यापेक्षा छोट्या बॅग डॉक्टर, अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदाराने पुरवठा केल्या आहेत. यामुळे युरिन बॅगचा घोटाळा उघडकीस आला आहे.

mumbai
पालिका रुग्णालयात युरिन बॅग घोटाळा

मुंबई- मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात असतानाच पालिका रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या युरिन बॅगमध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. ज्या प्रमाणात या युरिन बॅग असायला हव्यात त्यापेक्षा छोट्या असल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

महापालिका रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याने येथे लाखो रुग्ण येतात. या रुग्णांवर ओपीडी तसेच भरती करून उपचार केले जाते. रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण गंभीर असल्यास त्यांना लघवी करण्यासाठी शौचालयात जाणे शक्य नसल्याने युरिन बॅग वापरल्या जातात. या बॅगमध्ये दोन लिटर लघवी साठवता येते. तसेच त्याचा पाईप एक मिटरहून लांब असतो. ज्यामुळे लघवीची पिशवी रुग्णाच्या बेडखाली दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवता येते.

मात्र, महापालिका रुग्णालयात पुरवठा करणाऱ्या युरिन बॅगमध्ये दोन लिटर ऐवजी दिड लिटर युरिन साठवता येते. या बॅगचा पाईपही 60 ते 65 सेंटीमीटरचा असल्याने बॅग रुग्णाच्या बाजूला बेडला अडकवली जाते. यामुळे रुग्णाला संसर्ग होण्याची शक्यता आहे. महापालिका रुग्णालयात ज्या युरिन बॅग वापरायला हव्यात त्यापेक्षा छोट्या बॅग डॉक्टर, अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदाराने पुरवठा केल्या आहेत. यामुळे युरिन बॅगचा घोटाळा उघडकीस आला आहे.

कारवाईची मागणी

मागवण्यात आलेल्या आणि सर्वत्र वापरण्यात येणाऱ्या युरिन बॅगपेक्षा छोट्या बॅग पालिका रुग्णालयात वापरल्या जात असल्याने या प्रकरणी संबंधित डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी अतिरिक्त आयुक्त एस.एम. काकाणी यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी कारवाईचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याचे सईदा खान यांनी सांगितले.

हेही वाचा- 'नाल्यांमध्ये जाणारा कचरा रोखण्यासाठी झोपडपट्टीतील गटारांवर जाळ्या बसवा'

Intro:मुंबई - मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात असतानाच पालिका रुग्णालयात पुरवठा करण्यात आलेल्या युरिन बॅगमध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. ज्या प्रमाणात या युरिन बॅग असायला हव्यात त्यापेक्षा छोट्या असल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली आहे. Body:महापालिका रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याने लाखो रुग्ण येतात. या रुग्णांवर ओपीडी तसेच रुग्णालयात भरती करून उपचार केले जातात. रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण गंभीर असल्यास त्यांना लघवी करण्यासाठी शौचालयात जाणे शक्य नसल्याने युरिन बॅग वापरल्या जातात. या बॅगमध्ये दोन लिटर लघवी साठवता येते. तसेच त्याचा पाईप एक मिटरहून लांब असतो. ज्यामुळे लघवीची पिशवी रुग्णाच्या बेडखाली दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवता येते.

मात्र महापालिका रुग्णालयात पुरवठा करणाऱ्या युरिन बॅगमध्ये दोन लिटर ऐवजी दिड लिटर युरिन साठवता येते. या बॅगचा पाईपही 60 ते 65 सेंटीमीटरचा असल्याने बॅग रुग्णाच्या बाजूला बेडला अडकवली जाते. यामुळे रुग्णाला संसर्ग होण्याची शक्यता आहे. महापालिका रुग्णालयात ज्या युरिन बॅग वापरायला हव्यात त्यापेक्षा छोट्या बॅगा डॉक्टर, अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदाराने पुरवठा केल्या आहेत. यामुळे युरिन बॅगचा घोटाळा उघडकीस आला आहे.

कारवाईची मागणी -
मागवण्यात आलेल्या आणि सर्वत्र वापरण्यात येणाऱ्या युरिन बॅग पेक्षा छोट्या बॅगा पालिका रुग्णालयात वापरल्या जात असल्याने या प्रकरणी संबंधित डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी अतिरिक्त आयुक्त एस एम काकाणी यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी कारवाईचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिल्याचे सईदा खान यांनी सांगितले.

बातमीसाठी युरिन बॅगचे vis, नगरसेविका डॉ. सईदा खान यांचा बाईट, p2c
पॅकेज Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.