Loksabha Election Live : सहावाजेपर्यंत ५९.७० % मतदान, बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१३% तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी ५०.८२%
नवी दिल्ली - सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पडली पार.. सहा वाजेपर्यंत ५९.७० % मतदान, बंगालमध्ये सर्वाधिक ८०.१३% तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी ५०.८२% मतदानाची नोंद. दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
सविस्तर वृत्त
..अन्यथा राज्यभरातून मराठा समाज मुंबईत आंदोलनास येईल, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
मुंबई- आज दादर येथील शिवाजी मंदिर याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांना या वर्षी आरक्षण नाकारल्याचा महत्वाचा मुद्दा या चर्चेत होता. जो पर्यंत मराठा समाजातील या मुलांना प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहील तसेच राज्यभर आंदोलन केले जाईल, असा निर्णय या चर्चेत घेण्यात आला.
सविस्तर वृत्त
दादरमध्ये पोलीस वसाहतीत आग; १५ वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू
मुंबई - दादर पश्चिम भवानी शंकर रोडवरील पोलीस वसाहतीत आग लागल्याची घटना घडली. पाच मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीत १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी चव्हाण असे त्या मुलीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त
जळगावात भरधाव कंटेनरची कारला धडक; ३ जण ठार १ गंभीर
जळगाव - बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळच्या सुमारास चोपडा शहराजवळ घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कंटेनर देखील रस्त्यावर उलटला.
सविस्तर वृत्त
नदीजोड प्रकल्पशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ मिटणार नाही - आठवले
लातूर - मराठवाड्यामधील दुष्काळ दूर करण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची गरज असून त्यांची अंमलबजावणी तत्काळ होण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आठवले २ दिवसांपासून लातूर जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज औसा तालुक्यातील जयनगर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. नदीजोड प्रकल्पाशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नसल्याने शासनाने नदी जोड प्रकल्प करणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी सांगितलं.
सविस्तर वृत्त