ETV Bharat / state

Drugs Smuggling : अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; दीड कोटींचं चरस जप्त, तिघांना अटक - Three arrested with drug

Drugs Smuggling : वडाळ्यासह शिवडी परिसरात वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत तिघांकडून ४ किलो ७७६ ग्रॅम चरसचा साठा जप्त करण्यात आलाय. पोलीसांनी त्यांच्याविरोधात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून १ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

Drugs Smuggling
Drugs Smuggling
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 8:18 AM IST

मुंबई Drugs Smuggling : वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत वडाळ्यासह शिवडी परिसरात तीन आरोपींना चरस तस्करीच्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलीय. या तिघांकडून पोलीसांनी ४ किलो ७७६ ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा चरसचा साठा जप्त केला असून त्याची किंमत तब्बल १ कोटी ४३ लाख रुपये असल्याचं पोलीसांनी सांगितलंय. शहानवाज शाबीर गफुर राजपूत, शरीफ शकील शेख आणि शोएब साबीर गफुर राजपूत अशी या तिघांची नावं असून अटकेनंतर तिघांनाही किल्ला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

अंगझडतीत सापडला चरसचा साठा : वडाळा परिसरात वांद्रे युनिटचे अधिकारी गस्त घालत होते. यावेळी या पथकाला वडाळ्यातील चार रोड, उन्निथा इमारतीसमोरील वडाळा गेट क्रमांक चार बसस्टॉपजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलीसांना उच्च प्रतीचा चरसचा साठा सापडला. त्यांच्या चौकशीत शोएब राजपूत याचे नाव समोर आलं असून त्यानेच ते चरस त्यांना विक्रीसाठी दिलं होतं. त्यामुळं या पथकानं शिवडीतील कुसूमबाई यासीम चाळीत शोएबला अन्य चरसच्या साठ्यासह ताब्यात घेतलं. या दोन्ही कारवाईत पोलीसांनी सुमारे पावणेपाच किलोचा उच्च प्रतीचा चरसचा साठा तसंच तीन मोबाईल जप्त केले असून, आरोपींकडून १ कोटी ४३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील तिन्ही आरोपींना अटक करुन किल्ला न्यायालयात हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

एनडीपीएस कलमांन्वये गुन्हा दाखल : परराज्यातुन मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तरुणांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ड्रग्स पेडलवर व अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुदध कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्यावरुन वडाळा, शिवडी, चार रस्ता या परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ३ इसमांना जेरबंद करण्यात आलंय. त्यांच्याकडून एकूण ४ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा "चरस" हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांच्याविरूध्द अमली विरोधी पथक कक्ष बांद्रा युनिट येथे कलम ८(क) सह २० (क), २९ तसंच एनडीपीएस कलम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करुन नमुद अटक आरोपीतांकडून एकूण ४ किलो ७७३ ग्रॅम वजनाचा "चरस" हा अंमली पदार्थ तसंच तीन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. International drug syndicate: एनसीबीची आंतरराष्ट्रीय 'ड्रग्ज सिंडिकेट'वर कारवाई; मोठ्या प्रमाणात एमडीएमए आणि गांजा जप्त
  2. Pune Crime News: पुण्यात 10 लाख रुपये किंमतीचे 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त
  3. Goa Drug Racket Arrested: गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; ऑलम्पिक विजेती आणि माजी पोलिसाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.