ETV Bharat / state

वाढदिवसाचा खर्च टाळून 7 हजार किलोचं अन्नधान्य वाटप - mumbai latest news

कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडलेल्या गरीबांना परदेशातील भारतीय नागरिक अन्नधान्याची मदत करत आहेत. अमेरिकेतील 11 वर्षाच्या रोहन सांखोलकर याने आपला वाढदिवस साजरा न करता बोरिवली दहिसर येथील गरजूंना 7000 किलोचे अन्नधान्य वाटप केले आहे.

mumbai
वाढदिवसाचा खर्च टाळून 7 हजार किलोचं अन्नधान्य वाटप
author img

By

Published : May 15, 2020, 8:53 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात अडचणीत सापडलेल्या गरीबांना परदेशातील भारतीय नागरिक अन्नधान्याची मदत करत आहेत. अमेरिकेतील 11 वर्षाच्या रोहन सांखोलकर याने आपला वाढदिवस साजरा न करता बोरिवली दहिसर येथील गरजूंना 7000 किलोचे अन्नधान्य वाटप केले आहे. या मदतीतून त्याने आपली सामाजिक कृतज्ञता पार पाडली आहे.

वाढदिवसाचा खर्च टाळून 7 हजार किलोचं अन्नधान्य वाटप

शिवसेनेच्या माध्यमातून दहिसर, संतोषी माता रोड येथील रहिवाशांना थेट आजोबा राजन नाडकर्णी यांच्यामार्फत मदत केली आहे. एकीकडे मुख्यमंत्री निधीसाठी लहान मुलं आपला वाढदिवसाच्या निधीतन तुटपुंजी मदत करताना पाहायला मिळत आहेत. आता शिवसेनेच्या माध्यमातून थेट अन्नधान्याची मदत करण्यासाठी लहान मुलांचं योगदान दिसत आहे.

कोण आहेत राजन नाडकर्णी?

राजन नाडकर्णी हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. ते बोरिवलीत राहतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांनी लोकाधिकार समितीत काम केले आहे. 2 वर्षापूर्वी दे देना बँकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांची अमेरिकेत मुलगी आहे. तिचा मुलगा रोहनचा 26 एप्रिलला वाढदिवस होता. तो त्याने साजरा न करता जमवलेल्या पैशातून गरजूंना धान्य दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.